नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदी आणि कॅप्टन स्मित यांना स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी केले आमंत्रित
नवी दिल्ली, 04 ऑक्टोबर (हिं.स.)। दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’च्या विमानात झालेला जीवघेणा हल्ला आपल्या धाडस आणि प्रसंगावधानाने टाळणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांच्या या शौर्याने प्रभावित होऊन इस्रा
नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदी आणि कॅप्टन स्मित यांना स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी केले आमंत्रित


नवी दिल्ली, 04 ऑक्टोबर (हिं.स.)।

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’च्या विमानात झालेला जीवघेणा हल्ला आपल्या धाडस आणि प्रसंगावधानाने टाळणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांच्या या शौर्याने प्रभावित होऊन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कॅप्टन स्मित यांना ‘जगातील हिरो’ असे संबोधले आहे. तसेच कॅप्टन स्मित आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्रायलच्या मे २०२७ मध्ये होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मशाल प्रज्वलित करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

यापूर्वी इस्रायली पंतप्रधानांनी शनिवारी रुग्णालयात दाखल असलेल्या ३८ वर्षीय कॅप्टन स्मित यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.कॅप्टन स्मित यांनी नेतन्याहू यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान सांगितले की, हल्ल्याच्या काही क्षण आधी सहवैमानिकाने प्रार्थना करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याचा आदर करत कॅप्टन स्मित यांनी समोरच्या दिशेने पाहण्यास सुरुवात केली आणि सहवैमानिक प्रार्थना करू लागला.

कॅप्टन स्मित यांनी सांगितले की, सुमारे ४ ते ५ मिनिटांनंतर अचानक त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस जोरदार प्रहार झाला. सुरुवातीला विमानात काही मोठी तांत्रिक बिघाड झाला असावा, असे त्यांना वाटले. मात्र, सलग प्रहार होऊ लागल्यानंतर विमानावर नव्हे, तर कॉकपिटमध्येच आपल्या सहवैमानिकाकडून हल्ला केला जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सहवैमानिकाने कॉकपिटमध्ये ठेवलेल्या आपत्कालीन ‘क्रॅश अॅक्स’ने कॅप्टन स्मित यांच्यावर हल्ला केला होता.

या हल्ल्यादरम्यानही कॅप्टन स्मित यांनी अद्भुत संयम आणि प्रसंगावधान दाखवले. विमानाचा आपत्कालीन सिग्नल सक्रिय करण्यात आला. त्यानंतर ३४ हजार फूट उंचीवरून विमानाने वेगाने खाली उतरत १७ हजार फुटांहून अधिक उंची गाठत सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग केले.या घटनेदरम्यान विमानाचे रडरही खराब झाले होते. मात्र, कॅप्टन स्मित यांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली आणि विमानातील सर्व १७४ प्रवाशांचे प्राण वाचले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande