वर्धा : कारंजा नगरपंचायतीचा मोठा निर्णय; आता दर रविवारी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार
वर्धा, 09 ऑक्टोबर (हिं.स.)। आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता कारंजा नगरपंचायतीने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच शहरात दर रविवारी संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नगरपंचायतीमार्फ
वर्धा : कारंजा नगरपंचायतीचा मोठा निर्णय; आता दर रविवारी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार


वर्धा, 09 ऑक्टोबर (हिं.स.)। आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता कारंजा नगरपंचायतीने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच शहरात दर रविवारी संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नगरपंचायतीमार्फत नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यापासून नागरिकांना मुबलक पाणी मिळत आहे. मात्र, काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याने वाहने धुणे, रस्त्यावर सडा मारणे, नळ सुरू ठेवणे अशा प्रकारे पाण्याचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाला म्हणून अमर्यादित वापर करणे योग्य नाही. पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे ही नागरिक आणि प्रशासनाची संयुक्त जबाबदारी आहे, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.

हे टाळा, नाहीतर दंड होणार

पिण्याच्या पाण्याने वाहने धुणे. घरासमोर, अंगणात सडा टाकण्यासाठी पाण्याचा अपव्यय. वापर नसताना नळ सुरू ठेवणे. घरातील गळती तात्काळ दुरुस्त न करणे. झाडांना गरजेपेक्षा जास्त पाणी देणे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande