अमरावती मनपाने नवरात्रोत्सवापूर्वी अंबादेवी पुलावर बसवली लोखंडी जाळी; सुरक्षिततेला प्राधान्य, कचऱ्याला अटकाव
अमरावती, 09 ऑक्टोबर (हिं.स.)। श्री अंबादेवीच्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेने भाविकांची सुरक्षा आणि शहराच्या स्वच्छतेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. शहरातील मुख्य तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या अं
अमरावती मनपाचा स्तुत्य उपक्रम: नवरात्रोत्सवापूर्वी अंबादेवी पुलावर बसवली लोखंडी जाळी; सुरक्षिततेला प्राधान्य, कचऱ्याला अटकाव!


अमरावती, 09 ऑक्टोबर (हिं.स.)। श्री अंबादेवीच्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेने भाविकांची सुरक्षा आणि शहराच्या स्वच्छतेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. शहरातील मुख्य तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या अंबादेवी पुलावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि नाल्यात कचरा टाकण्याला पायबंद घालण्यासाठी मनपा प्रशासनाकडून तत्काळ लोखंडी जाळी बसवण्यात आली आहे.

नवरात्रोत्सवात अमरावतीतील श्री अंबादेवी व श्री एकविरा देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविकांची रीघ लागते. या काळात अंबादेवी पुलावर मोठी वाहतूक आणि गर्दी असते. भाविकांच्या सुरक्षिततेची संभाव्य धोके लक्षात घेऊन मनपाने खबरदारीचा उपाय म्हणून ही जाळी उभारली आहे.अमरावती महानगरपालिकेच्या या तत्पर आणि नियोजनबद्ध कारवाईचे अमरावतीकर नागरिक आणि भाविकांकडून जोरदार स्वागत होत आहे. उत्सवाच्या काळात शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी मनपाने उचललेले हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande