कालच्या मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजाराचे जोरदार पुनरागमन; सेन्सेक्स ८७९ अंकांनी वधारला
नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर (हिं.स.)। एक दिवस आधी झालेल्या जोरदार घसरणीनंतर भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी दमदार पुनरागमन केले. बाजाराची सुरुवातच तेजीने झाली आणि दिवसभर खरेदीचा जोर कायम राहिला. मध्येच नफावसुलीमुळे काही प्रमाणात विक्रीचा दबाव निर्माण झाल
Stock Market Closing


नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर (हिं.स.)। एक दिवस आधी झालेल्या जोरदार घसरणीनंतर भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी दमदार पुनरागमन केले. बाजाराची सुरुवातच तेजीने झाली आणि दिवसभर खरेदीचा जोर कायम राहिला. मध्येच नफावसुलीमुळे काही प्रमाणात विक्रीचा दबाव निर्माण झाला, मात्र त्याचा बाजाराच्या तेजीवर फारसा परिणाम झाला नाही. अखेर दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८७९.०९ अंकांनी, म्हणजेच १.२३ टक्क्यांनी वाढून ७२,४७२.३३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २८८.६५ अंकांनी, म्हणजेच १.३० टक्क्यांनी वधारून २२,५२०.४५ अंकांवर स्थिरावला.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १८३.४३ अंकांच्या वाढीसह ७१,७७६.६७ अंकांवर उघडला. सुरुवातीला काही काळ विक्रीचा दबाव जाणवला. मात्र, त्यानंतर गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी सुरू केल्याने बाजाराने वेग पकडला. दुपारी दोन वाजल्यानंतर सेन्सेक्सने १,०७५.९६ अंकांची झेप घेत ७२,६६९.२० अंकांची दिवसातील सर्वोच्च पातळी गाठली. मात्र, व्यवहाराच्या अखेरच्या अर्ध्या तासात झालेल्या नफावसुलीमुळे निर्देशांक उच्चांकावरून काहीसा खाली आला. तरीही सेन्सेक्सने दमदार वाढ नोंदवत व्यवहाराचा शेवट केला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ८३.१५ अंकांच्या वाढीसह २२,३१४.९५ अंकांवर उघडला. सुरुवातीच्या किरकोळ घसरणीनंतर खरेदीदार सक्रिय झाल्याने निफ्टीने तेजी पकडली. दिवसभरातील खरेदीच्या जोरावर निर्देशांक ३४८.९५ अंकांनी वाढून २२,५८०.७५ अंकांवर पोहोचला. त्यानंतर झालेल्या नफावसुलीमुळे निफ्टी काहीसा घसरला आणि अखेर २२,५२०.४५ अंकांवर बंद झाला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांनी सर्वाधिक लक्ष वेधले. माहिती तंत्रज्ञान निर्देशांक ३.०२ टक्क्यांनी वधारला, तर बीएसईचा तंत्रज्ञान निर्देशांक २.१० टक्क्यांनी वाढला. एफएमसीजी क्षेत्रातील समभागांनाही गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे एफएमसीजी निर्देशांकात २.०२ टक्क्यांची वाढ झाली. बँकिंग, वाहन, भांडवली वस्तू, ग्राहक टिकाऊ वस्तू, आरोग्यसेवा, धातू आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्देशांकांनीही हिरव्या निशाणात व्यवहार संपवला. तेल आणि वायू क्षेत्रातील समभागांमध्ये सुरुवातीला विक्री झाली, मात्र नंतरच्या खरेदीमुळे हा निर्देशांकही ०.२४ टक्क्यांनी वाढला. व्यापक बाजारात मिडकॅप निर्देशांक १.५६ टक्क्यांनी, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.५४ टक्क्यांनी वधारला.

दिवसभरात राष्ट्रीय शेअर बाजारात ३,२४५ समभागांमध्ये व्यवहार झाले. त्यापैकी १,९७८ समभाग वाढीसह, तर १,२६७ समभाग घसरणीसह बंद झाले. त्याचप्रमाणे, सेन्सेक्सवर सूचीबद्ध असलेल्या ३० शेअर्सपैकी केवळ एक शेअर वाढीसह बंद झाला, तर २९ शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीतील ५० समभागांपैकी ४६ समभागांनी तेजी नोंदवली, तर चार समभाग घसरले.

प्रमुख समभागांमध्ये अपोलो हॉस्पिटल्स ४.७२ टक्के, आयटीसी ४.३१ टक्के, आयशर मोटर्स ४.१७ टक्के, टीसीएस ३.८५ टक्के आणि अदानी पोर्ट्स ३.१० टक्क्यांनी वधारले. दुसरीकडे, टॉरंट पॉवर २.१४ टक्के, बीएसई लिमिटेड १.४३ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज ०.६५ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील ०.६१ टक्के आणि सिप्ला ०.४४ टक्क्यांनी घसरले. एकूणच, माहिती तंत्रज्ञान आणि एफएमसीजी समभागांमधील खरेदीमुळे बाजाराला मोठा आधार मिळाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande