राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शुभेच्छा
नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी रविवारी आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, चंदीगड, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, केरळम, लक्ष
STATES UNION TERRITORIES WISH


नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी रविवारी आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, चंदीगड, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, केरळम, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, पंजाब आणि तमिळनाडू येथील नागरिकांना त्यांच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रपती मुर्मू यांनी एक्सवर लिहिले, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि विविध परंपरा असलेल्या या राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी भारताच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशांतील नागरिकांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी मी शुभेच्छा देते.

उपराष्ट्रपतींनी सांगितले की, यापैकी प्रत्येक राज्य आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक वारशामुळे, समृद्ध परंपरांमुळे आणि देशाच्या प्रगतीसाठी दिलेल्या अमूल्य योगदानामुळे समृद्ध आहे. या राज्यांनी विकास, समृद्धी आणि सर्वसमावेशक प्रगतीच्या मार्गावर सातत्याने पुढे जावे आणि 'विकसित भारत' या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी आपले योगदान देत राहावे.

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, तमिळनाडूतील मेहनती आणि उद्यमशील नागरिकांनी भारताच्या प्रगतीमध्ये उत्कृष्ट योगदान दिले आहे. उत्पादन क्षेत्र, वाहन उद्योग आणि वस्त्रोद्योगापासून ते इलेक्ट्रॉनिक्स, अंतराळ तंत्रज्ञान, आरोग्य सेवा तसेच उदयोन्मुख उद्योगांपर्यंत राज्याने नावीन्य, कौशल्य आणि औद्योगिक उत्कृष्टतेच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तमिळनाडूतील नागरिकांना आपल्या सांस्कृतिक ओळखीचा आणि परंपरांचा मोठा अभिमान आहे. तमिळ संस्कृतीने देशाच्या सभ्यताविषयक प्रवासाला असंख्य प्रकारे समृद्ध केले आहे. हा दिवस येणाऱ्या काळात तमिळनाडूतील प्रत्येक नागरिकासाठी आनंद, यश आणि नवीन संधी घेऊन येवो.

गौरवशाली इतिहास, अद्भुत शौर्य आणि समृद्ध संस्कृतीने नटलेले हरियाणा राज्य हे देशाचे भूषण आहे. येथील लोकपरंपरा आणि चैतन्यशील ग्रामीण संस्कृतीने नेहमीच देशाच्या सांस्कृतिक वारशात भर घातली आहे. हरियाणातील नागरिकांनी आपल्या कठोर परिश्रम आणि समर्पणातून कृषी, क्रीडा आणि संरक्षण सेवांपासून ते उद्योग, शिक्षण आणि नवउद्योगांपर्यंत विविध क्षेत्रांत आपली प्रतिभा आणि दृढनिश्चय सिद्ध केला आहे. येथील खेळाडू तिरंग्याचा मान उंचावत आहेत, तर शेतकरी देशाची अन्नसुरक्षा अधिक मजबूत करत आहेत.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, समृद्ध सांस्कृतिक वारसा, चैतन्यशील संस्कृती आणि परंपरांनी नटलेल्या आंध्र प्रदेशने तसेच येथील नागरिकांनी भारताच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. येथील नागरिकांचे कठोर परिश्रम, उद्यमशीलता आणि महत्त्वाकांक्षा राज्याच्या विकासाचा प्रवास सातत्याने घडवत आहेत. आंध्र प्रदेशने विकास, समृद्धी आणि आपल्या सर्व नागरिकांसाठी नवीन संधी निर्माण करण्याच्या मार्गावर सातत्याने पुढे जावे.

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, मनमोहक नैसर्गिक सौंदर्य आणि प्रचंड मानवी क्षमता असलेले केरळम भारताच्या गौरवात आणखी भर घालते. या राज्याने सातत्याने प्रगती आणि समृद्धीच्या दिशेने वाटचाल करावी. येथील प्रतिभावान नागरिकांच्या कठोर परिश्रम, कौशल्य आणि समर्पणाच्या बळावर आंध्र प्रदेशने केवळ समृद्धीच्या दिशेने वाटचाल केली नाही, तर देशाच्या विकासातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande