
रत्नागिरी, 1 नोव्हेंबर (हिं.स.) । महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित ६५ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा रत्नागिरी केंद्राची प्राथमिक फेरी दि. १६ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे.
रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात दररोज सायंकाळी ७ वाजता ही नाट्य स्पर्धा होणार असून, यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण २१ संघ आपली नाट्यकलाकृती सादर करणार आहेत. प्रेक्षकांसाठी या नाट्यप्रेक्षकांसाठी तिकिटाचे दर रु. १५/- व रु. १०/- असे ठेवण्यात आले आहेत.
संपूर्ण नाट्यफेरीचे वेळापत्रक असे -
(नाटक, लेखक व दिग्दर्शक) :
* १६ नोव्हेंबर (सोमवार) : मेला तो शेवटचा होता (लेखक: विजय खानविलकर, दिग्दर्शक: दशरथ रंगणकर)
* १७ नोव्हेंबर (मंगळवार): व्हायरल आजीोबा (लेखक: प्रल्हाद जाधव, दिग्दर्शक: लक्ष्मीकांत भातकर)
* १९ नोव्हेंबर (गुरुवार): लाईफलाईन (लेखक: अनिल काकडे, दिग्दर्शक: ऑकार पंडित)
* २० नोव्हेंबर (शुक्रवार): पितामह उवाच (लेखक: मिलिंद दातार, दिग्दर्शक: गणेश जोशी)
* २१ नोव्हेंबर (शनिवार): प्रिय आईस (लेखक: वसंत कानेटकर, दिग्दर्शक: प्रज्वला बामुल)
* २२ नोव्हेंबर (रविवार): ब्लेम ट्रॅप अँड गेम (लेखक व दिग्दर्शक: राजेश गोसावी)
* २३ नोव्हेंबर (सोमवार): ऑन एनीमी ऑफ द पिपल (लेखक: तन्मय राऊत, दिग्दर्शक: गणेश राऊत)
* २५ नोव्हेंबर (बुधवार): वॉरंट (लेखक: गंगाराम गवणकर, दिग्दर्शक: चंद्रकांत कांबळे)
* २६ नोव्हेंबर (गुरुवार): चांदणी (लेखक: रोहित पगारे, दिग्दर्शक: अजिंक्य केसरकर)
* २७ नोव्हेंबर (शुक्रवार): स्मृतिगंध (लेखक: अमोल मांडवकर, दिग्दर्शक: अनिल मांजरेकर)
* २८ नोव्हेंबर (शनिवार): स्वप्नपंखा (लेखक: दिनेश कवडे, दिग्दर्शक: सुयोग बेंडल)
* २९ नोव्हेंबर (रविवार): Exception 375 (लेखक व दिग्दर्शक: भूषण बागूल)
* ३० नोव्हेंबर (सोमवार): षडयंत्र (लेखक: सुरेश जयराम, दिग्दर्शक: शेखर मुळ्ये)
* १ डिसेंबर (मंगळवार): अंधारवाटा (लेखक व दिग्दर्शक: प्रवीण कांबळे)
* २ डिसेंबर (बुधवार): सूर राहू दे (लेखक: शंकर नवरे, दिग्दर्शक: जनार्दन पेडणेकर)
* ४ डिसेंबर (शुक्रवार): दैवायत्तम कुले जन्म (लेखक: डॉ. समीर मोने, दिग्दर्शक: ओंकार पाटील)
* ५ डिसेंबर (शनिवार): दि ऑॅनॉमिनस (लेखक: अतुल साळवे, दिग्दर्शक: संदीप शेट्ये)
* ६ डिसेंबर (रविवार): शेवंता जिती हाय (लेखक: प्रल्हाद जाधव, दिग्दर्शक: निलेश सज्जन मुळे)
* ७ डिसेंबर (सोमवार): करायला गेलो एक आणि... (लेखक व दिग्दर्शक: धनवंत कासेकर)
* ८ डिसेंबर (मंगळवार): फक्त एकदा वळून बघ (लेखक: रविंद्र वाडकर, दिग्दर्शक: संदेश तोडणकर)
* ९ डिसेंबर (बुधवार): तिचे संदर्भ नसलेली गोष्ट (लेखक: डॉ. प्रमोद खाडिलकर, दिग्दर्शक: स्वप्नील धनावडे)
रत्नागिरीतील तमाम नाट्यप्रेक्षकांनी आणि नागरिकांनी या सर्व नाट्यकलाकृतींचा मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी