देशभक्ती आणि युद्धाच्या वेदनेचा संगम : सलमान खानच्या 'मातृभूमी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
मुंबई, 11 नोव्हेंबर, (हिं.स.)। अभिनेता सलमान खानच्या आगामी ''मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस'' या चित्रपटाचा आज ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सुमारे साडेचार मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये देशभक्ती, सैनिकांचे बलिदान आणि युद्धाच्या मानवी पैलूंचे दर्शन घडते
सलमान


मुंबई, 11 नोव्हेंबर, (हिं.स.)। अभिनेता सलमान खानच्या आगामी 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' या चित्रपटाचा आज ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सुमारे साडेचार मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये देशभक्ती, सैनिकांचे बलिदान आणि युद्धाच्या मानवी पैलूंचे दर्शन घडते. हा चित्रपट केवळ युद्धभूमीपुरता मर्यादित नसून, सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावनिक संघर्षावर विशेष भर देतो. संपूर्ण ट्रेलरमध्ये सलमान एका दमदार, ॲक्शन-प्रधान अवतारात दिसून येतो.

ट्रेलरमधून हे स्पष्ट होते की, एका सैनिकासाठी देशाची सेवा सर्वोपरि असली, तरी त्यांच्या कुटुंबीयांचे आयुष्य सतत अनिश्चिततेच्या छायेखाली असते. कर्तव्यावर असताना घरापासून दूर राहणे आणि प्रियजनांचा वारंवार निरोप घेणे, या प्रक्रियेत नेहमीच काहीतरी वाईट घडण्याची भीती मनात असते. चित्रपटात तीव्र ॲक्शन दृश्ये, हाणामारी (हँड-टू-हँड कॉम्बॅट) आणि भव्य दृश्ये पाहायला मिळतात. यासोबतच, चित्रपट एक मार्मिक संदेश देतो. युद्धाची विनाशलीला केवळ एका बाजूपुरती मर्यादित नसते, तर ती दोन्ही बाजूंच्या कुटुंबांवर परिणाम करते, ज्यामुळे शांततेची नितांत गरज अधोरेखित होते.

सलमान खानसोबतच चित्रांगदा सिंगने या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये त्यांची पडद्यावरील केमिस्ट्री आणि काही अत्यंत भावूक क्षण दिसून येतात. नयनरम्य ठिकाणे, उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि प्रभावी संगीत यामुळे चित्रपटाची कथा अधिक परिणामकारक झाली आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित हा चित्रपट 'सलमान खान फिल्म्स'च्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande