येत्या १६ नोव्हेंबरपासून दूध दरात चार रुपयांची वाढ, कात्रज डेअरीच्या बैठकीत निर्णय
दुग्धजन्य पदार्थांच्या दरांत देखील 10 टक्के वाढीचे संकेत पुणे, 13 नोव्हेंबर (हिं.स.) - अमूल आणि मदर डेअरच्या दुधाचे दर नुकतेच वाढले. त्या पाठोपाठ आता सर्वसामान्यांच्या दूध दरातही प्रति लिटर 4 रुपयांची वाढ होणार आहे. येत्या 16 नोव्हेंबरपासून ही द
कात्रज दूध


- दुग्धजन्य पदार्थांच्या दरांत देखील 10 टक्के वाढीचे संकेत

पुणे, 13 नोव्हेंबर (हिं.स.) - अमूल आणि मदर डेअरच्या दुधाचे दर नुकतेच वाढले. त्या पाठोपाठ आता सर्वसामान्यांच्या दूध दरातही प्रति लिटर 4 रुपयांची वाढ होणार आहे. येत्या 16 नोव्हेंबरपासून ही दरवाढ लागू होणार आहे. या संदर्भात आजच पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड अर्थात कात्रज डेअरीची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील 45 सहकारी आणि खासगी दूध ब्रँडचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. पुण्यातील कात्रज डेअरीतील कार्यालयात झालेल्या या बैठकीत गाय आणि म्हशीच्या दुधात प्रति लिटर चार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. एकीकडे वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि साखरेच्या दरात होत असलेल्या वाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दररोजच्या जीवनात होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता दूधाच्या दरात वाढ होणार आहे.

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज डेअरी) येथे संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत दूध व्यवसायातील वाढत्या उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. डीलर रेट, बाहेरील दूध ब्रँडचे होत असलेले आक्रमण, साखर आणि डिझेलच्या दरात झालेली वाढ, यामुळे ही दरवाढ करावी लागते आहे, असे दूध उत्पादकांचे म्हणणे आहे. तर, दुग्धजन्य पदार्थांच्या दरांत देखील 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

मदर डेअरी, अमूल नंतर आता गोकुळ दुधाच्या दरातही वाढ होणार आहे. गोकुळच्या दूध विक्री दरात वाढ करण्याचे संकेत गोकुळचे नूतन चेअरमन राजेश पाटील यांनी दिले आहेत. शनिवारी होणाऱ्या नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत दूध दरवाढ करण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीस कात्रज डेअरीचे अध्यक्ष अरुण चांभारे, दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे मानद सचिव प्रकाश कुतवळ यांच्यासह राज्यातील प्रमुख सहकारी आणि खासगी दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज डेअरीच्या दूध उत्पादक आणि व्यावसायिक संघाच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे आतापर्यंत 62 रुपये प्रतिलिटर दराने मिळणारे कात्रजचे दूध आता 66 रुपये प्रतिलिटर दराने विकले जाणार आहे. म्हणजेच ग्राहकांना प्रत्येक लिटरमागे चार रुपये अधिक मोजावे लागतील. विशेष म्हणजे केवळ दुधाचे दरच वाढणार नाहीत, तर कात्रजच्या दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतही वाढ होणार आहे.

दुग्धजन्य पदार्थांचे दर सुमारे 10 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दही, ताक, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही महागाईचा फटका बसणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा दूध खरेदीचा भाव आणि ग्राहकांना किरकोळ विक्रीसाठी आकारला जाणारा भाव यांच्यातील वाढती तफावत हे दरवाढीमागील महत्त्वाचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर पशुखाद्य, वाहतूक, प्रक्रिया आणि उत्पादनाशी संबंधित इतर खर्चातही वाढ होत आहे.

या वाढत्या खर्चामुळे डेअरी व्यवसायावरील आर्थिक दबाव वाढत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. याबाबत संघटनेचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी दूध खरेदीचा भाव आणि किरकोळ विक्रीचा भाव यांच्यातील वाढती तफावत तसेच उत्पादन खर्चातील वाढ यामुळे दरवाढीचा विचार करावा लागल्याचे स्पष्ट केले. याआधी अमूल आणि मदर डेअरीसारख्या प्रमुख दूध ब्रँड्सनीही दूध दरात वाढ केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता कात्रज डेअरीनेही दरवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरातील कात्रजच्या दुधावर अवलंबून असलेल्या ग्राहकांचे घरगुती बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.

प्रकाश कुतवळ म्हणाले की, कात्रज दुधाच्या दरात चार रुपयांनी वाढ केली आहे. खरेदीदर वाढल्याने शेतकऱ्याला हा आधार देणारा धंदा आहे. तुकाराम मुंढेंच्या कारवाईमुळे दुधात अमुलाग्र बदल झाले आहेत. आमच्या पनीरच्या किमतीत वाढ झाली आहे. दुधाची क्वालिटी आम्हाला छान मिळते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande