एमसीएच्या स्पीस प्लस पोर्टलवर फेडरल बँकेच्या समावेशामुळे नवीन कंपन्यांसाठी बँक खाते उघडण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ
मुंबई, 16 नोव्हेंबर (हिं.स.) : केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या (एमसीए) ''स्पीस प्लस'' या पोर्टलमध्ये फेडरल बँकेला समाविष्ट करण्यात आले आहे. याबाबतची घोषणा फेडरल बँकेने आज केली आहे. भारतात नवीन कंपनी स्थापन करण्यासाठी सरकारचे ''
एमसीएच्या स्पीस प्लस पोर्टलवर फेडरल बँकेच्या समावेशामुळे नवीन कंपन्यांसाठी बँक खाते उघडण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ


मुंबई, 16 नोव्हेंबर (हिं.स.) : केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या (एमसीए) 'स्पीस प्लस' या पोर्टलमध्ये फेडरल बँकेला समाविष्ट करण्यात आले आहे. याबाबतची घोषणा फेडरल बँकेने आज केली आहे. भारतात नवीन कंपनी स्थापन करण्यासाठी सरकारचे 'स्पीस प्लस' (SPICe+) हे अधिकृत पोर्टल आहे आणि या पोर्टलद्वारे उद्योजक आपल्या नवीन कंपनीची नोंदणी करतात. फेडरल बँकेला या पोर्टलवर समाविष्ट करण्यात आल्यामुळे आता कोणतीही नवीन कंपनी स्थापन करताना उद्योजकांना फेडरल बँकेत खाते उघडणे अत्यंत सोपे आणि कागदपत्रांच्या दृष्टीने झटपट होणार आहे.

स्पीस प्लस पोर्टल हे विविध सुविधा एकाचवेळी प्रदान करणारे डिजिटल मंच आहे आणि ते एमसीएने सुरु केलेले आहे. या मंचामुळे कंपनीची स्थापना आणि वेगवेगळ्या कायदेशीर नोंदणी अतिशय सुलभ झाल्या आहेत. या प्रक्रियेत बँक खाते उघडण्याची प्रक्रिया देखील समाविष्ट आहे. फेडरल बँक आता या पोर्टलवर समाविष्ट झाल्यामुळे, उद्योजक, स्टार्टअप्स आणि नव्याने उदयास येत असलेल्या उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना नोंदणी करताना त्या फेडरल बँकेला त्यांची पसंतीची बँक म्हणून सहजपणे निवडू शकतात. त्यामुळे कंपनी स्थापनेपासून ते बँकिंग प्रक्रिया सुरू होईपर्यंतचा प्रवास अतिशय सुरळीत झाला आहे.

नवीन सुविधेबाबात भाष्य करताना फेडरल बँकेचे रिटेल लायबिलिटी अँड फी प्रॉडक्ट्सचे कार्यकारी उपाध्यक्ष तसेच कंट्री हेड जॉय पी. व्ही. म्हणाले, 'उद्योजक कंपनी स्थापन करत असताना कंपनीच्या शुभारंभापासूनच त्यांना विश्वासार्ह बँकिंग सुविधेच्या माध्यमातून बँकेची साथ प्रदान करणे आणि त्याआधारे त्यांची व्यावसायिक वाटचाल सोपी करणे हा या सुविधेचा उद्देश आहे.'

स्टार्टअप्स, एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) आणि कॉर्पोरेट ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी फेडरल बँक आपल्या डिजिटल क्षमता आणि ग्राहक-केंद्रित सेवा अधिकाधिक सक्षम करत चालल्या आहेत. नाविन्यपूर्ण उत्पादने, ऑनलाईन यंत्रणेत सहजसोपा प्रवेश आणि मजबूत डिजिटल पायाभूत सुविधांच्या माध्यमातून, बँक देशभरात उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाच्या वृद्धीला चालना देण्यासाठी कटिबद्ध आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande