चिमुकल्या स्पंदनची सामाजिक बांधिलकी; पिग्मी बँकेतील १,६०० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द
नाशिक, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। सामाजिक बांधिलकी आणि दातृत्वाची जाणीव वयावर अवलंबून नसते, याचा प्रत्यय सात वर्षीय स्पंदन अर्चना हेमंत सोनार या चिमुकल्याने दिला आहे. नाशिक येथील जत्रा हॉटेल परिसरात राहणारा व ओझर येथील पोद्दार स्कूलमध्ये शिक्षण घेणारा
Chimukalya Spandan's social


नाशिक, 18 नोव्हेंबर (हिं.स.)।

सामाजिक बांधिलकी आणि दातृत्वाची जाणीव वयावर अवलंबून नसते, याचा प्रत्यय सात वर्षीय स्पंदन अर्चना हेमंत सोनार या चिमुकल्याने दिला आहे. नाशिक येथील जत्रा हॉटेल परिसरात राहणारा व ओझर येथील पोद्दार स्कूलमध्ये शिक्षण घेणारा स्पंदन याने आपल्या पिग्मी बँकेत साठवलेली १ हजार ६०० रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत म्हणून दिली.

स्पंदन याने ही रक्कम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी उपजिल्हाधिकारी (प्रशासन) कुंदन हिरे उपस्थित होते. अगदी लहान वयात स्वतःच्या बचतीतून समाजहितासाठी मदत करण्याची स्पंदनची ही कृती निश्चितच प्रेरणादायी आहे. स्वतःच्या इच्छा-आकांक्षांसाठी साठवलेली रक्कम गरजूंच्या मदतीसाठी देण्याचा त्याचा निर्णय सामाजिक संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण ठरला आहे.

स्पंदनच्या या छोट्याशा, पण मोलाच्या योगदानाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कौतुक केले. चिमुकल्या वयात समाजाप्रती असलेली ही जाणीव आणि मदतीची भावना इतरांसाठीही प्रेरणादायी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande