गौळाणे व अंबेबहुला येथील शेतकरी संतप्त; रिंग रोडसाठी पोलिस बळ वापरणार तर सामूहिक आत्महत्या करू
रिंग रोड संपादनास विरोध नाही मात्र योग्य दर मोबदला द्या मगच आमच्या शेतात पाय ठेवा नाशिक, 18 नोव्हेंबर, (हिं.स.)। मुंबई महामार्गा लगत असलेल्या गौळाणे व अंबेबहुला या गावांमध्ये रिंग रोड च्या संपादनास गेलेल्या महसुल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना स
Farmers in Goulane and Ambebahula


Farmers in Goulane and Ambebahula


रिंग रोड संपादनास विरोध नाही मात्र योग्य दर मोबदला द्या मगच आमच्या शेतात पाय ठेवा

नाशिक, 18 नोव्हेंबर, (हिं.स.)। मुंबई महामार्गा लगत असलेल्या गौळाणे व अंबेबहुला या गावांमध्ये रिंग रोड च्या संपादनास गेलेल्या महसुल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी परत पाठविले . आमचा रिंग रोडच्या कामास विरोध नाही मात्र योग्य दर द्या तरच इकडे पाय ठेवा . पोलिस बळाचा वापर कराल तर दोन्ही गावातील शेतकरी सामुहिक आत्महत्या करतील असा इशारा देत अशी संतप्त भूमिका शेतकऱ्यांनी घेतली .

गेल्या काही दिवसांपासून रिंग रोड संपादनासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे . आज तहसिलदार तसेच महसूल विभागाचे अधिकारी पोलिस प्रशासनासह अंबेबहुला येथे गेले होते .मात्र गौळाणे व अंबेबहुला येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला . जोपर्यंत योग्य दर व मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही जागा देणार नाही . दोघ गावांसंदर्भात मुख्यमंत्र्याकडे झालेल्या बैठकित शेतकऱ्यांनी नव्वद टक्के शेती संरक्षण विभागाला देण्यात आली आहे फक्त दहा टक्के शेती शिल्लक आहे . त्यात आता रिंग रोड जाणार यासाठी दोघ गावांना विशेष पॅकेज देण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या . मात्र ते वारंवार वेळ काढू पणा करीत आहेत . नित्याने संपर्क करून ही ते सहकार्य करत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले .

शासनाने इतर गावांमध्ये दिलेला दर आणि आमच्या दोघ गावांमध्ये मोठी तफावत आहे . ती तफावत दूर करावी . निवाडा झाला असला तरी पुर्ननिवाडा करावा . योग्य मोबदला द्यावा मगच संपादनाचे काम हाती घ्यावे . अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .

यावेळी पोलिस उपअधिक्षक योगेश म्हस्के , तहसिलदार पंकज पवार ,पोलिस निरिक्षक धीरज महाजन , सर्कल सत्यजित गोसावी , तलाठी अरुण मोरे यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले . शेतकऱ्यांचा रोष पाहता त्यांनींही काढता पाय घेतला . याप्रसंगी दोघ गावातील संजय चुंभळे , संतोष सहाणे , सुरेश देशमुख , शंकर गडकरी , दत्तू थापेकर , किशोर केदार , केशव देशमुख , किरण लांडे , रामदास लांडे , सहादू गवारी , मोहन भांडे , पुंडलिक देशमुख , दिपक देशमुख , योगेश गडकरी , उल्हास देशमुख , विशाल सहाणे , बाळासाहेब चुंभळे , प्रभाकर चुंभळे , खंडेराव सहाणे , संजय चव्हाण आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

प्रतिक्रिया

महसुल विभागाचे अधिकारी आज अंबेबहुला येथे रिंग रोड च्या कामासाठी आले होते . मात्र त्यांनी शेतकऱ्यांचा उद्रेक पाहिला .अन काढता पाय घेतला . योग्य मोबदला मिळाल्या शिवाय आम्ही जागा देणारच नाही . वेळ आली तर सामुहीक आत्महत्या करू .

संजय चुंभळे ; शेतकरी

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande