क्रोमा-कार्नी अहवाल : भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राच्या विकासाचा वेग वाढवणार
प्रीमियम उत्पादने, पोर्टफोलिओ विस्तार आणि नवीन बाजारपेठ ₹३ लाख कोटींचा पुढचा टप्पा गाठणार मुंबई, 18 नोव्हेंबर (हिं.स.) : टाटा समूहाचा एक भाग आणि भारतातील आघाडीचा ओम्नीचॅनल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर असलेल्या ''क्रोमा''ने मुंबईतील जुहू येथे आपले पहिल
क्रोमा


* प्रीमियम उत्पादने, पोर्टफोलिओ विस्तार आणि नवीन बाजारपेठ ₹३ लाख कोटींचा पुढचा टप्पा गाठणार

मुंबई, 18 नोव्हेंबर (हिं.स.) : टाटा समूहाचा एक भाग आणि भारतातील आघाडीचा ओम्नीचॅनल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर असलेल्या 'क्रोमा'ने मुंबईतील जुहू येथे आपले पहिले स्टोअर सुरू केल्याच्या २० वर्षपूर्तीनिमित्त यंदा आपले १००वे वर्ष साजरे करत असलेल्या ग्लोबल मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्म 'कार्नी'च्या सहकार्याने 'हाऊ इंडिया अपग्रेड्स' हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतातील ग्राहकांचा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला आहे, हे या अहवालातून दिसून येते. यासोबतच, देशातील खरेदीच्या पुढील नवीन पर्वाला दिशा देणाऱ्या मुख्य कारणांचाही या अहवालात वेध घेण्यात आला आहे.

शिबाशिष रॉय, सीईओ आणि एमडी, इन्फिनिटी रिटेल लिमिटेड-क्रोमा म्हणाले की,“गेल्या दोन दशकांत भारतातील ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ पहिल्यांदाच एखादी वस्तू खरेदी करण्याच्या टप्प्यापासून पुढे सरकली आहे. आता ग्राहकांचा कल अधिक चांगला अनुभव, उच्च आकांक्षांची पूर्तता आणि सतत 'अपग्रेड' होण्याकडे वाढत असल्याचे आम्ही पाहिले आहे. 'हाऊ इंडिया अपग्रेड्स' या अहवालाद्वारे आम्ही ग्राहकांच्या सवयींमधील हेच बदल आणि या क्षेत्राची भविष्यातील दिशा समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तंत्रज्ञान जसजसे अधिक आधुनिक होत आहे, तसतशी क्रोमामधील आमची भूमिका हीच आहे की आम्ही योग्य उत्पादने, तज्ञांचा सल्ला, किफायतशीर योजना आणि विक्रीनंतरची उत्तम सेवा देऊन ग्राहकांचा इलेक्ट्रॉनिक्स खरेदी आणि वापराचा प्रवास सोपा करावा; जेणेकरून देशभरातील ग्राहक पूर्ण विश्वासाने अपग्रेड करू शकतील.”

कौशिका माधवन, चेअरमन, कार्नी इंडिया म्हणाल्या की,“भारतातील ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाचे भविष्य केवळ किती उपकरणांची विक्री होते यावर ठरणार नाही, तर ग्राहक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपले जीवनमान कसे उंचावतात यावर ठरेल. प्रीमियम उत्पादनांना मिळणारी वाढती पसंती, उदयोन्मुख लहान शहरांतील वाढती मागणी आणि ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा यांचा हा संगम नावीन्य, मूल्यनिर्मिती आणि दीर्घकालीन विकासाच्या नव्या संधी निर्माण करत आहे.”

अहवालातील ठळक निष्कर्ष: महानगरे आणि मोठ्या शहरांच्या पलीकडे विस्तारत आहे भारतातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची वाढ

· २०२२ ते २०२५ दरम्यान तृतीय श्रेणी शहरांमध्ये क्रोमाची विक्री ४०% वार्षिक दराने वाढली. तर, प्रथम श्रेणी शहरांमध्ये हा दर ३५%, द्वितीय श्रेणी शहरांमध्ये ३०% आणि मोठ्या शहरांमध्ये १३% इतका राहिला.

· क्रोमाच्या एकूण विक्रीत लहान बाजारपेठांचा वाटा २०२२ मधील ३२% वरून वाढून २०२५ मध्ये ४४% वर पोहोचला आहे.

एकूण मागणीच्या बाबतीत महानगरे व मोठी शहरे आजही आघाडीवर आहेत आणि पुढेही त्यांची वाढ सुरूच राहील; मात्र लहान शहरे त्यापेक्षा कितीतरी अधिक वेगाने पुढे जात आहेत. यामुळेच भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील वाढीच्या पुढील टप्प्यात या लहान शहरांची भूमिका सातत्याने महत्त्वाची ठरत आहे.

भारतीय ग्राहक आता महागडी आणि अधिक चांगली उत्पादने निवडत आहेत

· २०२१ ते २०२५ दरम्यान क्रोमावर विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनच्या सरासरी किमतीत ३४% वाढ झाली आहे.

· २०२२ ते २०२५ दरम्यान ₹५०,००० पेक्षा जास्त किमतीच्या स्मार्टफोनची बाजारपेठ २६% वार्षिक दराने वाढली आहे.

· एसी श्रेणीमध्ये इन्व्हर्टर एसीचा वाटा २०१५ मधील केवळ ९% वरून वाढून २०२५ मध्ये ९१% झाला आहे. म्हणजेच, हे आता केवळ एक प्रीमियम फीचर न राहता बाजारपेठेचे सर्वसामान्य मानक बनले आहे.

· २०२५ मध्ये विकल्या गेलेल्या दर तीन टीव्हीपैकी एका टीव्हीचा आकार ५५ इंच किंवा त्याहून मोठा होता. याउलट, २०१५ मध्ये २५ पैकी केवळ एकच टीव्ही या आकाराचा विकला जात असे.

भारतीय घरांमध्ये स्थान मिळवत आहेत नवीन काळातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने

· २०२१ ते २०२५ दरम्यान डिशवॉशर आणि ड्रायरच्या विक्रीत २९% वार्षिक दराने वाढ नोंदवली गेली.

· गेमिंग डिव्हाइसेस: २०२१ ते २०२५ या कालावधीत यांची विक्री २६% वार्षिक दराने वाढली.

· हिअरेबल्स (इअरबड्स, हेडफोन इ.): या श्रेणीमध्ये २०२१ ते २०२५ दरम्यान २३% वार्षिक दराने वाढ झाली.

· एअर फ्रायरची विक्री २०२१ ते २०२५ दरम्यान २२% वार्षिक दराने वाढली.

भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स बाजार पेठेतील पुढील ₹३ ट्रिलियनची मोठी संधी

· 'क्रोमा x कार्नी: हाऊ इंडिया अपग्रेड्स' अहवालानुसार, भारताची इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ २०२४ मधील ₹७ ट्रिलियनवरून २०३० पर्यंत सुमारे ₹१० ट्रिलियनपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

· अहवालानुसार, या अतिरिक्त ₹३ ट्रिलियनच्या संधीमध्ये डिव्हाइस अपग्रेड्सची भूमिका सर्वात महत्त्वाची असेल.

· डिशवॉशर, एअर फ्रायर, ड्रायर, गेमिंग डिव्हाइसेस आणि वेअरेबल यांसारख्या श्रेणी खरेदीच्या पुढील चक्राला आकार देतील, तसेच ज्या बाजारपेठांमध्ये या उत्पादनांचा प्रसार अद्याप कमी आहे, तिथे पहिल्यांदाच होणारा वापरही यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande