मुंबईच्या महापौर रितू तावडेंची अॅमस्टरडॅमच्या महापौर फेम्के हलसेमा यांनी घेतली भेट
मुंबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.) - मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची अ‍ॅमस्टरडॅम नगरीच्‍या महापौर फेम्के हलसेमा (Femke Halsema) यांनी आज, १९ नोव्हेंबर रोजी भेट घेतली. मुंबई महानगरासोबत आर्थिक संबंध सुधारण्याकामी त्यांनी ही भेट घेतली. मुंबई महानगरात व
Amsterdam Mayor Femke Halsema BMC Mayor Ritu Tawde


मुंबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.) - मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची अ‍ॅमस्टरडॅम नगरीच्‍या महापौर फेम्के हलसेमा (Femke Halsema) यांनी आज, १९ नोव्हेंबर रोजी भेट घेतली. मुंबई महानगरासोबत आर्थिक संबंध सुधारण्याकामी त्यांनी ही भेट घेतली.

मुंबई महानगरात वेगाने सुरू असलेल्या आर्थिक विकास आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांची फेम्‍के हलसेमा यांनी माहिती घेतली. तसेच मुंबईतील घरांची उपलब्‍धता, लोकसंख्या, वाहतूक व्यवस्था या महत्‍वपूर्ण विषयांवर महापौर तावडे यांच्‍याशी संवाद साधला.

मुंबईतील वाहतूक व्यवस्थेतेच्या संदर्भात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांबाबत महापौर हलसेमा यांना माहिती देण्‍यात आली. मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या जाळ्यामुळे येत्या दोन ते तीन वर्षात वाहतूक व्यवस्था अधिक बळकट होईल, असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले. वाहतुकीवरील ताण कमी करण्याच्या अनुषंगाने जकात नाक्यांच्या जागेवर सुरू असणाऱ्या 'ट्रान्सपोर्ट हब' प्रकल्पाचीही माहिती त्यांनी दिली. मुंबईतील विविध विकास प्राधिकरणाच्या समन्वयातून सुरू असलेल्या इमारत पुनर्विकासाच्या प्रकल्पांची माहिती देण्‍यात आली.

मुंबईतील समुद्र स्वच्छतेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि 'द ओशन क्लीनअप' यांच्यात झालेल्‍या सामंजस्य कराराचेही महापौर हलसेमा यांनी कौतुक केले. घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य, वाहतुकीच्या प्रकल्पांच्या निमित्ताने दोन्ही महानगरांना भेडसावणाऱ्या समस्यांवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्‍या माहितीचे आदान प्रदान करण्याबाबतचा मानसही महापौर हलसेमा यांनी व्यक्त केला. तर, मुंबई महानगरासमोरील आव्हानाच्या निमित्ताने अधिक परिणामकारक उपाययोजनांचे स्वागतच आहे, असे महापौर रितू तावडे यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande