
कोल्हापूर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ
( गोकुळ)ने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दूध दरवाढीचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना मात्र या निर्णयाचा फटका बसणार आहे. प्रशासक काळातील ७० कोटींची तूट भरून काढण्यासाठी गोकुळ दूध संघाने प्रतिलिटर ६ रुपयांचा बोजा ग्राहकांच्या माथ्यावर मारला आहे.गेल्या दहा वर्षांतील सर्वात मोठी ऐतिहासिक वाढ गोकुळच्या नवीन संचालक मंडळांनी केली असून त्याचा फटका आता ग्राहकांना बसणार आहे.
गोकुळच्या विक्री दुधामध्ये प्रति लिटर ६ रुपयांची तर गायीच्या प्रतिलिटर दुधामागे ४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
दुग्ध व्यवसायाला बळ मिळावे आणि दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळावे, यासाठी संघाने म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ करून दूध उत्पादकांना दिलासा देणारा हा निर्णय घेतला आहे. 21 नोव्हेंबर 2026 पासून म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर 3 रुपये, तर गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर 2 रुपये वाढ करण्यात आली आहे. म्हैस दूध खरेदी दरात करण्यात आलेली प्रति लिटर 3 रुपयांची वाढ ही गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक दरवाढ आहे. या निर्णयामुळे संघाचे दूध संकलन वाढण्यासयानुसार 6.0 फॅट व 9.0 एस.एन.एफ. गुणप्रतिच्या म्हैस दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर 55.00 रुपयांवरून 58 रुपये, तर 3.5 फॅट व 8.5 एस.एन.एफ. गुणप्रतिच्या गाय दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर 37 रुपयांवरून 39 रुपये करण्यात आला आहे. या दरवाढीमुळे गोकुळशी संलग्न दूध उत्पादकांना महिन्याकाठी सुमारे चौदा कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळणार आहे.
यावर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याच्या उपलब्धतेवर आणि पशुधनाच्या दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे दूध संकलनातही चढ-उतार होत आहेत. यामुळे दूध उत्पादकांना आर्थिक स्थैर्य मिळावे आणि दुग्ध व्यवसाय सातत्याने सक्षम राहावा, यासाठी 'गोकुळ'ने दूध खरेदी दरवाढीचा निर्णय घेतला आहे.
मात्र ग्राहकांना मात्र ६ रुपयांचा भार प्रतिलिटर विक्री दुधामागे ठेवण्यात आला आहे.
सध्या म्हैस प्रतिलिटर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 72 रुपये इतके आहे. ते आता 78 रुपये होणार आहे. तर गाय प्रतिलिटर दूध 54 रुपये इतके आहे तर ते आता 60 रुपये इतके होणार आहे. तर बाहेरील पुणे मुंबईमध्ये म्हैस प्रतिलिटर दूध हे 78 रुपये आहे ते आता 84 रुपये इतके होणार आहे. तर गाय प्रति लिटर दूध 60 रुपये होते ते आता 66 रुपये इतके होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar