
मुंबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। महिंद्राने घोषणा केली की, त्यांच्या एक्सईव्ही ९एस कारला भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅम (भारत एनसीएपी) अंतर्गत ५-स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे, ज्यामुळे ही कार आयसीई आणि इलेक्ट्रिक या दोन्ही विभागांतील भारतातील सर्वात सुरक्षित ७-सीटर एसयूव्ही ठरली आहे. तसेच, हे सर्वोच्च रेटिंग मिळवणारी भारतातील पहिलीच ७-सीटर ईव्ही आहे.
एक्सईव्ही ९एस ने अडल्ट ऑक्यूपण्ट प्रोटेक्शन (एओपी) मध्ये ३२ पैकी ३१.१५ गुण आणि चाइल्ड ऑक्यूपण्ट प्रोटेक्शन (सीओपी) मध्ये ४९ पैकी ४५ गुण मिळवले आहे, तसेच भारत एनसीएपी अंतर्गत आजवर चाचणी झालेल्या सर्व ७-सीटर वाहनांमध्ये सर्वाधिक म्हणजेच एकूण ७६.१५ गुण प्राप्त केले आहेत. हे ५-स्टार रेटिंग आपल्या एसयूव्ही अभियांत्रिकी आणि विकास तत्त्वज्ञानाचा सुरक्षेला अविभाज्य भाग बनवण्याच्या महिंद्राच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करते.
या निकालासह, इंग्लो प्लॅटफॉर्मवर डिझाइन केलेल्या महिंद्राच्या तिन्ही इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्हीनी आता ५-स्टार भारत एनसीएपी रेटिंग मिळवले आहे आणि या प्लॅटफॉर्मच्या प्रबळ सुरक्षा अभियांत्रिकीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह बिझनेसचे प्रेसिडंट आणि महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. वेलुसामी आर. म्हणाले, “आम्ही देशभरातील ग्राहकांकडून एक्सईव्ही ९एस ला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल कृतज्ञ आहोत. भारतातील नंबर १ ईव्ही* बनणे हे ग्राहकांनी ब्रँडवर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. ५-स्टार भारत एनसीएपी रेटिंगमुळे हा विश्वास अधिक दृढ झाला आहे, तसेच ग्राहकांना खात्री मिळते की, ते केवळ डिझाइन, कामगिरी आणि तंत्रज्ञानामध्ये नव्हे तर सुरक्षेमध्येही उत्कृष्ट असलेली वेईकल निवडत आहेत. आम्ही ग्राहकांच्या सातत्यपूर्ण विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारी उत्पादने देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
नोव्हेंबर २०२५ मध्ये “इंडियाज बिग न्यू इलेक्ट्रिक” म्हणून लाँच झालेली महिंद्रा एक्सईव्ही ९एस ७-सीटरमध्ये उपयुक्ततेसोबत प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये ७ एअरबॅग्ज, पाच रडार आणि एक व्हिजन कॅमेरा असलेली लेव्हल २+ अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (एडीएएस), डीओएमएस (Eyedentity) सह ड्रायव्हर ड्राउझिनेस डिटेक्शन (चालकाला डुलकी लागल्यास सतर्क करणारी यंत्रणा) आणि लाइव्ह व्ह्यू, रेकॉर्डिंग व लाइव्ह कम्युनिकेशन वैशिष्ट्यांसह सिक्युअर३६० प्रो यांचा समावेश आहे. प्रवासी सुरक्षा आणि दैनंदिन बहुउपयोगितेवरील या लक्षामुळे ही कार भारतातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक वेईकल* बनण्यास मदत झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर