
चेन्नई, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। मोंट्रा इलेक्ट्रिक या मुरुगप्पा ग्रुपच्या क्लीन मोबिलिटी ब्रँडने आज आपल्या प्रमुख लास्ट-माईल इलेक्ट्रिक प्रवासी तीनचाकी वाहन श्रेणीतील नवीन उत्पादन सुपर ऑटोच्या लाँचची घोषणा केली. सुपर ऑटो प्लॅटफॉर्मवर डिझाइन केलेले हे नवीन व्हेरिएंट उत्तम आरामदायीपणा आणि एैसपैस जागा देते. हा व्हेरिएंट या श्रेणीतील सर्वोत्तम कामगिरी आणि ड्रायव्हर्स व फ्लीट ऑपरेटर्सनी मागणी केलेली वैशिष्ट्ये यांची सांगड घालून या क्षेत्रात नवीन मापदंड प्रस्थापित करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
ड्रायव्हर्सचा ज्या वैशिष्ट्यांवर सर्वाधिक विश्वास असतो, त्यांभोवती सुपर ऑटो डिझाइन करण्यात आला आहे. याची १० किलोवॅट परमनंट मॅग्नेट मोटर ६० एनएम पीक टॉर्क निर्माण करते आणि या व्हेरिएंटची ३२ टक्के ग्रेडिएबिलिटी तीव्र चढण आत्मविश्वासाने चढण्यास मदत करते. १०.६ केडब्ल्यूएच क्षमतेची बॅटरी दैनंदिन ड्रायव्हिंगमध्ये १८० किमीहून अधिक प्रत्यक्ष रेंज देते आणि ऑफ-बोर्ड ४०ए चार्जरच्या साहाय्याने ही बॅटरी शून्यापासून पूर्ण चार्ज होण्यासाठी ५ तास ३० मिनिटे लागतात. या ऑटोमध्ये या श्रेणीतील एक अनोखे, कारसारखे वैशिष्ट्य देखील देण्यात आले आहे: हिल-होल्ड असिस्ट, जे उतारावर वाहन जागेवर स्थिर ठेवते. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि निवडता येणारे इको, ड्राईव्ह व पॉवर मोड्स, तसेच रिव्हर्स आणि पार्क असिस्टमुळे दैनंदिन ड्रायव्हिंग अधिक सोपे होते. एकात्मिक मोठे एलईडी लाइट्स दृश्यमानता सुधारतात आणि केबिन लाइटमुळे सोयीस्करपणा वाढतो. हायड्रॉलिक शॉक अॅब्झॉर्बर्ससह डबल-फोर्क कॉइल-स्प्रिंग फ्रंट सस्पेंशन, १२०/८० आर१२ रेडियल ट्यूबलेस टायर्स आणि उघडता येणाऱ्या टेल गेटसह मागील बाजूस सामानाची केबिन यामुळे आरामदायीपणा आणि उपयुक्तता अधिक वाढते. ड्रायव्हर्सना वन मोंट्राचा अॅक्सेस देखील मिळतो.
हे नवीन व्हेरिएंट मोंट्रा इलेक्ट्रिकच्या ‘पहले आप’ तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब आहे, जे ग्राहकांना प्रथम प्राधान्य देण्यावर आणि त्यांच्या दैनंदिन गरजांनुसार उत्पादने विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करते.
कंपनी आपल्या ‘इज्जत’ मूल्यावरील विश्वासही अधोरेखित करते, ज्यामध्ये ड्रायव्हर्सचा आणि उपजीविका कमावण्यासाठी ते करत असलेल्या कष्टांचा आदर करण्याच्या महत्त्वावर भर दिला जातो.
मोंट्रा इलेक्ट्रिकचे (टीआय क्लीन मोबिलिटी प्रा. लि.) ई-३-व्हीलर विभागाचे सीईओ श्री. दीपेंद्र शर्मा म्हणाले, “आपल्या शहरांना गतिमान ठेवणाऱ्या ड्रायव्हर्सचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घेतल्याचा परिणाम म्हणजे हे नवीन सुपर ऑटो व्हेरिएंट आहे. ग्रेडिएबिलिटी आणि रेंजपासून हिल-होल्ड असिस्ट आणि १एम अॅपपर्यंत प्रत्येक वैशिष्ट्याची निवड योग्यरित्या करण्यात आली आहे, ज्यामुळे दररोज यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींसाठी इलेक्ट्रिक वाहतूक अधिक विश्वासार्ह आणि अधिक फायदेशीर ठरेल. आम्हाला हे उत्पादन बाजारपेठेत आणताना अभिमान वाटत आहे.”
शर्मा पुढे म्हणाले, “आमची ‘इज्जत मतलब पहले आप’ मोहीम ऑटो ड्रायव्हर समुदायाप्रती असलेली आमची कटिबद्धता दर्शवते. त्यांचे कष्ट, त्यांची कमाई आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षांचा आदर राखून या नवीन व्हेरिएंटची निर्मिती करण्यात आली आहे.”
सुपर ऑटो ५ रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे आणि किंमत ३.९७ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) आहे. मोंट्रा इलेक्ट्रिकचे ३एस (सेल्स, सर्व्हिस, स्पेअर्स) नेटवर्क आता संपूर्ण भारतात १०० हून अधिक आउटलेट्सपर्यंत विस्तारले आहे आणि रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांच्या वाढत्या संख्येला दृढ पाठबळ देत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर