उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये महाराष्ट्रातील भाविकाचा मृत्यू
रुद्रप्रयाग, २ नोव्हेंबर (हि.स.) : उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील प्रसिद्ध मदमहेश्वर धामच्या दर्शनासाठी जात असताना महाराष्ट्रातील एका २८ वर्षीय भाविकाचा प्रकृती खालावल्याने मृत्यू झाला. सागर सुनील साळुंके असे मृत भाविकाचे नाव असून, ते रविवार
उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये महाराष्ट्रातील भाविकाचा मृत्यू


रुद्रप्रयाग, २ नोव्हेंबर (हि.स.) : उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील प्रसिद्ध मदमहेश्वर धामच्या दर्शनासाठी जात असताना महाराष्ट्रातील एका २८ वर्षीय भाविकाचा प्रकृती खालावल्याने मृत्यू झाला. सागर सुनील साळुंके असे मृत भाविकाचे नाव असून, ते रविवारी संध्याकाळी ट्रेक मार्गावर ते अचानक बेशुद्ध पडले होते.

यासंदर्भात आज, सोमवारी जिल्हा आपत्कालीन परिचालन केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील रहिवासी असलेले सागर सुनील साळुंके हे मदमहेश्वर धामच्या दर्शनासाठी जात होते. प्रवासादरम्यान अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर डीडीआरएफ (जिल्हा आपत्ती प्रतिसाद दल) आणि आपदा मित्रांच्या मदतीने त्यांना रस्त्यापर्यंत आणण्यात आले.त्यानंतर त्यांना रुद्रप्रयाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी सोमवारी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, रुद्रप्रयाग जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यात कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. ऋषिकेश-केदारनाथ राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील प्रमुख मोटार मार्ग आणि केदारनाथ पायी मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती.

-----------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande