महाराष्ट्र सदनात उद्या ‘सूर दीपावली’ संगीत सोहळ्याचे आयोजन
पं. धनंजय जोशी आणि धनश्री देशपांडे यांच्या गायनाची मेजवानी नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर (हिं.स.) : दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या वतीने आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने मंगळवार,
सूर दीपावली संगीत सोहळा


* पं. धनंजय जोशी आणि धनश्री देशपांडे यांच्या गायनाची मेजवानी

नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर (हिं.स.) : दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या वतीने आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता नवीन महाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली येथे ‘सूर दीपावली’ या विशेष संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दीपावलीच्या आनंदोत्सवात सांगीतिक रंग भरणाऱ्या या कार्यक्रमात रसिकांना अभंग, नाट्यगीते आणि भावगीतांची सुरेल मेजवानी अनुभवता येणार आहे. या सोहळ्यात ख्यातनाम गायक सुरमणी पं. धनंजय जोशी आणि प्रसिद्ध गायिका धनश्री देशपांडे आपल्या सुमधुर गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करणार आहेत.

या संगीत सोहळ्यासाठी प्रवेश विनामूल्य असून, राजधानी दिल्लीतील नागरिकांनी, मराठी बांधवांनी आणि संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक पर्वाचा आनंद घ्यावा, असे आवाहन निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande