
आठवडाभरात सोन्याच्या दरात १२ हजार ५४० रुपयांची घसरण; चांदीही २० हजार रुपयांनी स्वस्त
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या किमतीतील घसरणीचे सत्र रविवारीही कायम राहिले. दुसरीकडे, आजच्या व्यवहारात चांदीच्या दरात नाममात्र वाढ नोंदवण्यात आली. देशातील बहुतांश सराफा बाजारांमध्ये आज सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ४४० रुपयांपासून ४८० रुपयांपर्यंत घसरले आहेत. तर चांदीच्या दरात प्रति किलो १०० रुपयांपर्यंतची किरकोळ वाढ झाली आहे.
किमतींमध्ये झालेल्या बदलामुळे आज देशातील बहुतांश सराफा बाजारांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख २५ हजार ८० रुपयांपासून १ लाख २५ हजार २३० रुपयांपर्यंत व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख १४ हजार ६५० रुपयांपासून १ लाख १४ हजार ८०० रुपयांदरम्यान आहे. चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाल्यामुळे दिल्लीच्या सराफा बाजारात आज चांदी प्रति किलो १ लाख ७५ हजार रुपयांवर विकली जात आहे.
साप्ताहिक आधारावर विचार केला असता, आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात कमजोरी नोंदवण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातील व्यवहारात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १२ हजार ५४० रुपयांपर्यंत घसरला. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोन्याचा दर साप्ताहिक आधारावर प्रति १० ग्रॅम ११ हजार ५०० रुपयांपर्यंत स्वस्त झाला. जागतिक बाजारातील कमजोर संकेतांमुळे चांदीच्या दरातही गेल्या आठवड्यात घसरण पाहायला मिळाली. अशा प्रकारे चांदीचा दर साप्ताहिक आधारावर प्रति किलो २० हजार रुपयांपर्यंत कमी झाला.
दिल्लीमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख २५ हजार २३० रुपये असून, २२ कॅरेट सोन्याची किंमत १ लाख १४ हजार ८०० रुपये नोंदवण्यात आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १ लाख २५ हजार ८० रुपये आणि २२ कॅरेट सोने १ लाख १४ हजार ६५० रुपयांवर विकले जात आहे. त्याचप्रमाणे अहमदाबादमध्ये २४ कॅरेट सोन्याचा किरकोळ दर १ लाख २५ हजार १३० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख १४ हजार ७०० रुपये नोंदवण्यात आला आहे.
या प्रमुख शहरांव्यतिरिक्त चेन्नईमध्ये आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १ लाख २५ हजार ८० रुपये आणि २२ कॅरेट सोने १ लाख १४ हजार ६५० रुपये दराने विकले जात आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्ये २४ कॅरेट सोने १ लाख २५ हजार ८० रुपये आणि २२ कॅरेट सोने १ लाख १४ हजार ६५० रुपये दराने व्यवहार करत आहे. भोपाळमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख २५ हजार १३० रुपये असून, २२ कॅरेट सोने १ लाख १४ हजार ७०० रुपयांवर विकले जात आहे.
जयपूरमध्ये २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १ लाख २५ हजार २३० रुपये आणि २२ कॅरेट सोने १ लाख १४ हजार ८०० रुपये दराने विकले जात आहे. पाटणा येथे २४ कॅरेट सोन्याची किंमत १ लाख २५ हजार १३० रुपये असून, २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख १४ हजार ७०० रुपये आहे. चंदीगडमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख २५ हजार २३० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख १४ हजार ८०० रुपये नोंदवण्यात आला आहे. लखनौच्या सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १ लाख २५ हजार २३० रुपये आणि २२ कॅरेट सोने १ लाख १४ हजार ८०० रुपये दराने विकले जात आहे.
देशातील इतर राज्यांप्रमाणे कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशाच्या सराफा बाजारांमध्येही आज सोन्याचे दर घसरले आहेत. या तिन्ही राज्यांच्या राजधान्या असलेल्या बेंगळुरू, हैदराबाद आणि भुवनेश्वर येथे आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख २५ हजार ८० रुपये आहे. त्याचप्रमाणे या तिन्ही शहरांतील सराफा बाजारांमध्ये २२ कॅरेट सोने १ लाख १४ हजार ६५० रुपये दराने विकले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule