
दुबई, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)आयसीसीने पुरुष क्रिकेटची नवीनतम खेळाडू क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा यांनी सर्वात मोठी झेप घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या बुमराहने कसोटी गोलंदाजांमध्ये संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले आहे. बांगलादेशविरुद्ध फलंदाजीत चांगली कामगिरी करणाऱ्या बावुमाने कसोटी फलंदाजांमध्ये तिसरे स्थान मिळवले आहे.
भारतीय क्रिकेटपटूंध्ये, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनीही आपल्या कसोटी फलंदाजीच्या क्रमवारीत सुधारणा केली आहे. ऋषभ पंत सहाव्या, शुभमन गिल सातव्या आणि यशस्वी जैस्वाल नवव्या स्थानावर पोहोचला आहे. यामुळे कसोटी क्रमवारीतील अव्वल १० मध्ये तीन भारतीय फलंदाज आहेत. इंग्लंडचे हॅरी ब्रूक आणि जो रूट यांनी पहिले दोन क्रमांक कायम राखले आहेत.
अव्वल १० गोलंदाजांच्या क्रमवारीत, ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क पहिल्या स्थानावर आहे, भारताचा जसप्रीत बुमराह तीन स्थानांनी झेप घेऊन दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे, तर इंग्लंडचा ऑली रॉबिन्सन दोन स्थानांनी झेप घेऊन तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा मार्को जानसेन आणि न्यूझीलंडचा मॅट हेन्री प्रत्येकी दोन स्थानांनी घसरून अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा दोन स्थानांनी झेप घेऊन सहाव्या स्थानी पोहोचला आहे, दक्षिण आफ्रिकेचा शिमरॉन हार्मर सातव्या स्थानी आहे, ऑस्ट्रेलियाचा स्कॉट बोलँड दोन स्थानांनी घसरून आठव्या स्थानी आला आहे, ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स नवव्या स्थानी आहे आणि ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड दहाव्या क्रमांकावर आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे