सीजेपीच्या अभिजीत दीपके आणि आशुतोष रांका विरोधात मुंबई पोलिसांनी लूकआउट नोटीस
मुंबई, 26 नोव्हेंबर (हिं.स.) - येथील शिवाजी पार्कमध्ये परवानगीशिवाय आंदोलन केल्याप्रकरणी काॅक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके आणि सह-संयोजक आशुतोष रांका यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी लूकआउट नोटीस जारी केले आहे. याआधी सह-संयोजक सौरव द
Abhijit-Deepke-Ashutosh-Ranka


मुंबई, 26 नोव्हेंबर (हिं.स.) - येथील शिवाजी पार्कमध्ये परवानगीशिवाय आंदोलन केल्याप्रकरणी काॅक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके आणि सह-संयोजक आशुतोष रांका यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी लूकआउट नोटीस जारी केले आहे. याआधी सह-संयोजक सौरव दास विरोधात लूकआउट नोटीस जारी करण्यात आले होते. या कारवाईमुळे सीजेपीचे हे तीनही महत्त्वाचे चेहरे आता मुंबई पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

सीजेपीकडून 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त शिवाजी पार्क परिसरात झालेल्या अनधिकृत आंदोलनासंदर्भात दाखल झालेली एफआयआर आणि हे तिन्ही नेते देश सोडून पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी ही कार्यवाही केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती, मात्र असं असतानाही सीजेपीने आंदोलन केले होते. या घटनेनंतर 3 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. यामध्ये अभिजीत दीपके, सौरव दास, आशुतोष रांका, प्रणव अहिरे आणि अजिंक्य शिंदे यांच्यासह पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांची नावे समाविष्ट आहेत. याशिवाय 400 ते 500 अज्ञात कार्यकर्त्यांचाही उल्लेख आहे. भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 189 आणि 223 सह महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तिन्ही नेत्यांविरोधात लूकआउट सर्क्युलर जारी करण्याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली की, संबंधित नेते देश सोडून जाऊ शकतात अशी शक्यता होती. या प्रकरणात सर्वप्रथम सौरव दास याचे नाव समोर आले होते. 23 नोव्हेंबर रोजी दिल्ली विमानतळावर लंडनला जाणाऱ्या विमानात चढण्यापासून त्याला रोखण्यात आले होते. सौरव दास यांच्या प्रकरणात एक वेगळी बाबही समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या पासपोर्टमधील जन्मस्थान, शिक्षण, पत्ता आणि आई-वडिलांच्या तपशीलातील विसंगतींवरून कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याविरोधात दास याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. 26 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने न्यायालयात स्पष्ट केले की, मुंबई पोलिसांच्या विनंतीवरून त्याच्याविरोधात लूकआउट नोटीस जारी करण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande