
लातूर, 28 नोव्हेंबर, (हिं.स.)। उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने शेतीपंपाच्या वायर तसेच बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या सेंट्रिंग प्लेट चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण अंदाजे १ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे उदगीर ग्रामीण व उदगीर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेले तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एका शेतातील पाण्याच्या मोटारीची वायर चोरी झाल्याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं. १६४/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास व चोरी गेलेल्या मालाचा शोध सुरू असताना पोलीस पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत लोणी रोड परिसरात दोन इसम मोटारसायकलवर फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांची नावे
१) रेहान जावेद मनियार, वय २१ वर्षे,
२) आश्पाक करीम शेख, वय २० वर्षे, दोघे रा. नांदेड नाका, उदगीर, ता. उदगीर अशी आहेत.
त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित मुद्देमाल मिळून आला. नमूद आरोपींकडून
१.बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या १८० सेंट्रिंग प्लेट – अंदाजे किंमत ८०,००० रुपये.
२.ड्रीम युगा कंपनीची मोटारसायकल (क्रमांक एमएच २४ एए ७८१९) – अंदाजे किंमत २०,००० रुपये.३.स्प्लेंडर कंपनीची मोटारसायकल (क्रमांक एमएच २४ झेड १२९८) – अंदाजे किंमत ५०,००० रुपये. व रोख रक्कम – १०,००० रुपये.अशा प्रकारे एकूण अंदाजे १ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत
१)उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे गुरनं. १६४/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं. २०२३.
२) गुरनं. ८३२/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं. २०२३.
३) गुरनं. ८४०/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं. २०२३. याप्रमाणे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दिलीप गाडे यांच्या नेतृत्वाखाली पथकातील पोलीस अमलदार संदीप केंद्रे, नामदेव चेवले, राजकुमार डबेटवार, सचिन नाडागुडे, बजरंग गजलवार, राजकुमार देवडे व नजीर बागवान यांनी केली आहे.सदर गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस अंमलदार फारुख शेख करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis