
लातूर, 03 नोव्हेंबर (हिं.स.)। रेणा सहकारी साखर कारखान्याकडून गाळप झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिमेट्रिक टन ३ हजार रुपये पहिला हप्ता जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण १८ कोटी ९५ लाख ८८ हजार रुपये दिवाळी सणापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis