म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे ९९ सदनिका व १०५ भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत उत्साहात
मुंबई, 03 नोव्हेंबर (हिं.स.) - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील विविध गृहनिर्माण योजनेतील ९९ सदनिका, मूर्तीजापूर (जि. छत्रपती
म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे ९९ सदनिका व १०५ भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत उत्साहात


मुंबई, 03 नोव्हेंबर (हिं.स.) - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील विविध गृहनिर्माण योजनेतील ९९ सदनिका, मूर्तीजापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील ७३ भूखंड व निलंगा (जि. लातूर) येथील ३२ भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. वैभव केदारे यांच्या हस्ते आज काढण्यात आली. सदर सोडतीसाठी एकूण २६४२ अर्ज प्राप्त झाले.

सोडतीमध्ये २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील सातारा, ईटखेडा, शहानुरवाडी, नक्षत्रवाडी येथील ९७ सदनिकांसाठी १९८६ अर्ज प्राप्त झाले. म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत उच्च उत्पन्न गटासाठी एन-७ सिडको व अत्यल्प उत्पन्न गटासाठी मुकुंदवाडी येथे प्रत्येकी एक सदनिका, मूर्तीजापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील मध्यम उत्पन्न गटासाठीच्या ७३ भूखंडांकरिता एकूण ६०१ अर्ज प्राप्त झाले. तर अत्यल्प उत्पन्न गटासाठी निलंगा (जि. लातूर) ३२ भूखंड विक्रीसाठी ५५ अर्ज प्राप्त झाले.

सोडत कार्यक्रमाला उच्चस्तरीय देखरेख समितीचे सदस्य सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री. सूर्यकांत शेटे, जिल्हा सूचना अधिकारी श्री. विद्याधर शेळके, मंडळाचे माजी मुख्य अधिकारी श्री. अण्णासाहेब शिंदे, कार्यकारी अभियंता श्री. बाहेगावकर आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande