
पक्षाच्यावतीने असे काही झालेच नाही असा दावा
नाशिक, 03 नोव्हेंबर (हिं.स.)। मागील महिन्यामध्ये दोन वेळा नाशिकला येऊनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना कार्यालयाचे भाडे थकल्यामुळे घरमालकाने गाळा खाली करायला सांगितले असल्याने मागील एक महिन्यापासून शिवसेना शिंदे पक्षाचे कार्यालय हे बंद आहे दरम्यान या सर्व प्रश्नावरती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी असं काही झालं नसल्याचे सांगितलं असून नवीन स्वतःच्या जागेमध्ये पक्षाचे कार्यालय जाणार आहे.
सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) नाशिकमधील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना सध्या अधिकृत कार्यालयाअभावी कामकाज करावे लागत आहे. जिल्ह्यात दोन आमदार, एक कॅबिनेट मंत्रिपद आणि महापालिकेत उपमहापौरांसह २६ नगरसेवकांचे मोठे संख्याबळ असूनही शहरात कायमस्वरूपी पक्षकार्यालय उपलब्ध नाही.
ज्यावेळी पक्ष नवीन होता त्यावेळी मायको सर्कल व सध्या बी. डी. भालेकर मैदानाजवळील पक्षाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी बांधलेल्या इमारतीत भाडेतत्त्वावर कार्यालय सुरू करण्यात आले होते. पण मागील काही महिन्यांपासून पक्षाच्या वतीने गाळामालकाला भाडे देण्यात आले नाही सातत्याने तगादा लावूनही घर मालकाला भाड्या मिळाले नाही त्यामुळे सर्वसाधारण मागील एक महिन्यापासून पक्षाचे अधिकृत कार्यालय हे बंद आहे या मागील एक महिन्यांमध्ये पक्षाचे सर्व सर्वे आणि अध्यक्ष असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन वेळा नाशिकला आले एक वेळा उपमहापौर विलास शिंदे यांनी आयोजित केलेल्या विकास कामांच्या भूमिपूजनासाठी व त्याचबरोबर अन्य कामांसाठी आणि दुसऱ्यांदा देशाचे राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण समारंभात सामील होण्यासाठी एकनाथ शिंदे नाशिक मध्ये आले होते दोन्ही दिवस त्यांनी संपूर्ण दिवस नाशिक मध्ये घालवला परंतु या प्रश्नाकडे मात्र त्यांनी लक्ष दिले नाही. पक्षाचे कार्यालयात बंद असल्यामुळे पक्षाचे पदाधिकारी सध्या आपल्या खाजगी कार्यालयातून किंवा महापालिकेतून आपला सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे.
पक्षाच्या वतीने मात्र असं काही झालं नाही अशा स्वरूपाचे दावे केले जात आहे.यावर बोलताना पक्षाचे महानगरप्रमुख बंटी तिदमे म्हणाले की, पक्षाने स्वतःच्या कार्यालयासाठी दोन-तीन ठिकाणी जागा बघितल्या आहेत लवकरच त्यातून योग्य तो निर्णय घेतला जाईल तर उपमहापौर विलास शिंदे यांनी सांगितले की असं काही झालंच नाहीये पक्षाच्या कार्यालयातूनच काम सुरू आहे या ठिकाणी पक्षाच्या नियमित बैठकाही होत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI