‘शेगावीच राणा’ या मराठी गीतात झळकणार बालकलाकार सात्विक सावरकर
अमरावती, 05 नोव्हेंबर, (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील अवघ्या दहा वर्षांचा बालकलाकार सात्विक मनोज सावरकर हा ‘शेगावीच राणा’ या संत श्री गजानन महाराजांवरील विशेष मराठी गीतामध्ये झळकणार आहे. वयाच्या अडीच वर्षांपासून
शेगावीच राणा’ या मराठी गीतात तळेगाव ठाकूरचा बालकलाकार सात्विक सावरकर झळकणार!..


अमरावती, 05 नोव्हेंबर, (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील अवघ्या दहा वर्षांचा बालकलाकार सात्विक मनोज सावरकर हा ‘शेगावीच राणा’ या संत श्री गजानन महाराजांवरील विशेष मराठी गीतामध्ये झळकणार आहे. वयाच्या अडीच वर्षांपासून मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या सात्विक आता या मराठी गीताच्या माध्यमातून आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. येत्या 10 जानेवारी 2027 रोजी गाण रिलीज होणार आहेत.त्यामुळे तळेगाव ठाकूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

संत श्री गजानन महाराजांच्या भक्तिमय जीवनावर आधारित ‘शेगावीच राणा’ या विशेष मराठी गीताचे अंतिम चित्रीकरण शेगाव येथील ऐतिहासिक कृष्णाजीच्या मळ्यात उत्साहात पार पडले. या चित्रीकरणात विदर्भातील अनेक नामवंत कलाकार सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, या गीताच्या शेवटच्या टप्प्यात ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेले सुप्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे हे देखील झळकणार आहेत.या गीताच्या चित्रीकरणाचे एकूण चार ते पाच टप्पे पार पडले. पहिल्या टप्प्यात देऊळगाव येथे पालखी सोहळ्याचे चित्रीकरण करण्यात आले. त्यानंतर अमरावती, मेहकर आणि कारंजा येथे विविध दृश्यांचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. अखेर शेगाव येथील ऐतिहासिक कृष्णाजीच्या मळ्यात अंतिम चित्रीकरण पार पडले.या गीताचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सहभागी झालेल्या बहुतांश कलाकारांचा संबंध विदर्भाशी आहे. संत श्री गजानन महाराजांवरील भक्तिभाव, विदर्भातील कलावंतांची कला आणि भव्य चित्रीकरण यांचा सुंदर संगम या गीतातून पाहायला मिळणार आहे.अवघ्या दहा वर्षांच्या सात्विक सावरकर याने लहान वयातच मॉडेलिंग क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली असून, आता ‘शेगावीच राणा’ या गीताच्या माध्यमातून त्याला मोठ्या कलाविश्वात झळकण्याची संधी मिळत आहे. त्याच्या या कलात्मक प्रवासामुळे तळेगाव ठाकूरसह संपूर्ण तिवसा तालुक्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

-----------------------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande