दिवाळीनिमित्त लासलगाव बाजार समितीचे लिलाव आठ दिवस बंद
१३ नोव्हेंबरपासून कांदा लिलाव पूर्ववत लासलगाव, 05 नोव्हेंबर (हिं.स.)। लासलगाव कांद्याच्या बाजारभावात दररोज होणाऱ्या चढ-उतारांमुळे शेतक-यांचे बाजारपेठेतील घडामोडींकडे लक्ष लागलेले असतानाच दिवाळी सणानिमित्त लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा
Lasalgaon Market Committee


१३ नोव्हेंबरपासून कांदा लिलाव पूर्ववत

लासलगाव, 05 नोव्हेंबर (हिं.स.)।

लासलगाव कांद्याच्या बाजारभावात दररोज होणाऱ्या चढ-उतारांमुळे शेतक-यांचे बाजारपेठेतील घडामोडींकडे लक्ष लागलेले असतानाच दिवाळी सणानिमित्त लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव आठ दिवस बंद राहणार आहेत. आज ५ नोव्हेंबरपासून गुरुवार (दि. १२ नोव्हेंबर) या कालावधीत कांद्याचे लिलाव होणार नसल्याने शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीचे नियोजन करूनच बाजार समितीत कांदा आणावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दिवाळी सणानिमित्त बाजार समितीतील हमाल व मजूर वर्गाला बाहेरगावी जाण्यासाठी सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे कांदा लिलावाचे कामकाज आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवार (दि. १३ नोव्हेंबर) पासून कांदा लिलाव निर्धारित वेळेत पूर्ववत सुरू होतील. दरम्यान, धान्य (भुसार) व तेलबिया या शेतीमालाचे लिलाव ५ ते १५ नोव्हेंबरदरम्यान बंद राहणार असून, सोमवार (दि. १६ नोव्हेंबर) पासून त्यांचे कामकाज सुरू होणार आहे.

बाजार समिती प्रशासनाने शेतकरी, व्यापारी, आडते, हमाल व इतर बाजार घटकांनी या सुटीची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. लाल कांद्याला ५२२५ रुपयांचा कमाल भाव, किमान २ हजार २७० रुपये, तर सर्वसाधारण ४५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. उन्हाळ कांद्याला कमाल ४ हजार ५०१ रुपये, किमान १ हजार ५०० रुपये, तर सर्वसाधारण ४ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande