जळगाव : एमआयडीसी पोलिसांकडून दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघड
जळगाव , 05 नोव्हेंबर (हिं.स.) एमआयडीसी पोलिसांनी मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत एका ३४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन बालकाकडूनही चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांतील चोरीच
जळगाव : एमआयडीसी पोलिसांकडून दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघड


जळगाव , 05 नोव्हेंबर (हिं.स.) एमआयडीसी पोलिसांनी मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत एका ३४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन बालकाकडूनही चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांतील चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

जळगाव शहरातील शनिपेठ परिसरात राहणारे तरबेज सैय्यद आसिफ यांनी १ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांची काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल अजिंठा चौफुलीजवळील ईदगाह कॉम्प्लेक्स येथील रिलायबल लॉजिंगच्या खाली पार्किंगमध्ये उभी केली होती. वैयक्तिक काम आटोपून ते परत आले असता पार्किंगच्या ठिकाणी त्यांची दुचाकी दिसून आली नाही.याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सुरू केला.पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळवून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा शोध घेतला. त्यानुसार सुलेमान अरमान तडवी (वय ३४, रा. किनगाव, ता. यावल) याची ओळख पटली. पोलिसांनी ३ नोव्हेंबर रोजी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सुमारे १० हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.दरम्यान, दुसऱ्या घटनेत जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील कैलास पाटील यांची काळ्या रंगाची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल २५ ऑक्टोबर २०२६ रोजी कुसुंबा शिवारातून चोरीला गेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८७९/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होताया चोरीचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे केला. तपासादरम्यान चोरी करणाऱ्या संशयिताची ओळख पटली. मात्र, संबंधित आरोपी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी त्याच्याकडून चोरीची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल हस्तगत केली दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी चोरीला गेलेल्या मोटारसायकली हस्तगत केल्याने दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande