डब्ल्यूपीएल २०२७ चे वेळापत्रक जाहीर, आरसीबी आणि मुंबईमध्ये सलामीची लढत रंगणार
नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर (हिं.स.)आगामी महिला आयपीएल (डब्ल्यूपीएल) हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. २०२७ चा हंगाम पुन्हा एकदा दोन शहरांमध्ये खेळला जाईल. सलामीचा सामना वडोदरा येथे, तर अंतिम सामना मुंबईत होईल. आगामी हंगाम १४ जानेवारी रोजी सु
महिला प्रीमियर लीग ट्रॉफी


नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर (हिं.स.)आगामी महिला आयपीएल (डब्ल्यूपीएल) हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. २०२७ चा हंगाम पुन्हा एकदा दोन शहरांमध्ये खेळला जाईल. सलामीचा सामना वडोदरा येथे, तर अंतिम सामना मुंबईत होईल. आगामी हंगाम १४ जानेवारी रोजी सुरू होईल आणि अंतिम सामना ७ फेब्रुवारी रोजी होईल. आगामी हंगामात एकूण २२ सामने खेळले जातील. पहिले ११ सामने वडोदरा येथे, तर पुढील ११ सामने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळले जातील. अंतिम सामना ७ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे.

भारतातील आयपीएलच्या धर्तीवर तयार करण्यात आलेला महिला डब्ल्यूपीएलचा पाचवा हंगाम १४ जानेवारी रोजी सुरू होईल. पहिला सामना वडोदरा मैदानावर गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि माजी विजेत्या मुंबई इंडियन्स यांच्या महिला संघांमध्ये खेळला जाईल. पाच संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत राऊंड-रॉबिन पद्धतीने एकूण २२ सामने खेळले जातील. पहिले ११ सामने वडोदरा येथे खेळले जातील, त्यानंतर पाचही संघांतील खेळाडू मुंबईला प्रवास करतील. पहिल्या हंगामापासून, डब्ल्यूपीए चे सामने एक किंवा दोन शहरांमध्ये खेळले गेले आहेत. आयपीएलप्रमाणे ही स्पर्धा भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केली जात नाही.

डब्ल्यूपीएल २०२७ हंगामात पाच संघ सहभागी होतील आणि लीग टप्प्याच्या शेवटी अव्वल स्थानी असलेला संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघ ५ फेब्रुवारी रोजी एलिमिनेटर सामना खेळतील, तर अंतिम सामना ७ फेब्रुवारी रोजी मुंबईत होईल.

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील बंगळूरुचा संघ महिला प्रीमियर लीगचा गतविजेता आहे. त्यांनी २०२६ मध्ये अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला हरवून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले होते. आता ते पुढील हंगामात आपले विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande