दिवाळीचा आनंद द्विगुणित होणार; गोदरेज प्रॉपर्टीजकडून ‘खुशियों की चाबी, मेरा गोदरेज घर’ मोहिमेचा शुभारंभ
मुंबई, 05 नोव्हेंबर, (हिं.स.)। या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गोदरेज प्रॉपर्टीजने ‘खुशियों की चाबी, मेरा गोदरेज घर’ या नव्या डिजिटल मोहिमेचा शुभारंभ केला आहे. आनंदाची व्याख्या ही प्रत्येकासाठी वेगळी असते, या संकल्पनेवर ही मोहिम आधारित आहे. आयुष्यातील
Godrej Properties


मुंबई, 05 नोव्हेंबर, (हिं.स.)। या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गोदरेज प्रॉपर्टीजने ‘खुशियों की चाबी, मेरा गोदरेज घर’ या नव्या डिजिटल मोहिमेचा शुभारंभ केला आहे. आनंदाची व्याख्या ही प्रत्येकासाठी वेगळी असते, या संकल्पनेवर ही मोहिम आधारित आहे. आयुष्यातील सर्वात आनंददायी आणि महत्त्वाचे क्षण हे आपल्या स्वतःच्या घरातच साकार होतात, हा संदेश या मोहिमेतून दिला जाईल.

‘एए वर्ल्ड’ या संस्थेने ही मोहिम तयार केली आहे. मानवी भाव-भावना, नातेसंबंध आणि दैनंदिन जीवनातील छोट्या क्षणांनाही महत्त्व देण्यात आले आहे. या छोट्या गोष्टींमुळेच घर या चार भिंतींनी उभारलेल्या साध्या वास्तूचे सुंदर घरकुलात रुपांतर होते. एका हृदयस्पर्शी कथानकाच्या माध्यमातून ही मोहिम घर चार भितींच्याही पलीकडे आहे, हे समजावते. घर हे आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगातील टप्पे, एकेमकांसोबत अनुभवलेल्या आनंदाचे खरे ठिकाण आहे, ही भावना यात मांडली आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून मानवी नात्यांचा उलगडा करणारी चित्रफित प्रदर्शित केली जाईल. हा सिनेमा मोहिमेचे मुख्य आकर्षण असेल. दिवाळीनिमित्ताने घरात अनुभवता येणा-या आनंदाचे विविध रंग या व्हिडिओमध्ये जिवंतपणे टिपले आहे. सण-उत्सव, आपल्या कौटुंबिक परंपरा आणि एकमेकांच्या सहवासातील सुखद क्षण यात पाहायला मिळतात. दिवाळीच्या दिवसांतील घरात अनुभवले जाणारे जिव्हाळ्याचे प्रत्येक प्रसंग या चित्रफितीत उलगडतात. आई-मुलगी सणवारीनिमित्ताने सुंदर सजतात, संपूर्ण कुटुंब फराळ-गोड अन्नपदार्थ बनवण्यात मग्न असते. अशातच कॉलेजमध्ये शिकणारा तरुण मुलगा घरी परततो, तेव्हा घरातील प्रत्येकाच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहतो. आजोबा आपल्या नातवंडांना प्रेमाने जवळ घेतात, संपूर्ण कुटुंब आपल्या घरातील पाळीव प्राण्याभोवती जमते. दिवाळीचा आनंद साजरा करते. दुसरीकडे, नवीन घरात तरुण जोडपे राहायला येते. लग्नानंतरच्या त्यांच्या पहिला दिवाळसणाची मांडणीही सुंदररित्या मांडण्यात आली आहे.

यातील संगीतही कौटुंबिक जिव्हाळ्याची ओढ लावते. हे पार्श्वसंगीत घरापासून दूरावलेल्या माणसाची घराबद्दलची ओढ व्यक्त करते. सणासुदीच्या काळात कुटुंबीयांचा उत्साह, कौटुंबिक जिव्हाळा या भावनांवर आधारित पार्श्वसंगीत आधारलेले आहे. हा संपूर्ण भावनिक प्रवास ‘घर के कोने कोने में खुशी, एक चाबी से खुलती है’ या अर्थपूर्ण ओळींनी संपतो. माणसाच्या आनंदाची वेगवेगळी रूपे असतात. पण खरा आनंद स्वतःच्या घरातच अनुभवता येतो, असा सुंदर संदेश या चित्रफितीत मिळतो.

गोदरेज प्रॉपर्टीजचे मुख्य विक्री, विपणन आणि ग्राहक केंद्रित अधिकारी सुभाशिष पटनाईक म्हणाले,” घरात आयुष्यातील अनेक आठवणी जपल्या जातात. घरात कौटुंबिक परंपरा जपल्या जातात, प्रियजनांसोबत वेळ घालवता येतो. माणसाच्या आयुष्यातील आनंद हा घरात बहरतो. ‘खुशियों की एक चाबी, मेरा गोदरेज घर’ या मोहिमेद्वारे ग्राहकांच्या या खास गोष्टी मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही मोहिम प्रत्येक घराला समृद्ध करणा-या भावना, आठवणी आणि अनुभवांचा सन्मान करते. ग्राहकांचा अढळ विश्वास आम्हांला जबाबदारीची जाणीव करून देते. आम्ही घरांच्या बांधणीसह माणसांचे आयुष्य बहरवणारा समाज घडवतो. या दिवाळीत आम्ही ग्राहकांचा आनंद आणि त्यांच्या अनुभवांचा उत्सव साजरा करणार आहोत.”

एए वर्ल्डचे संस्थापक आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर आकाश दास आणि अमर सिंग म्हणाले,”दिवाळी हा सण कुटुंबीयांना घराची परतीची वाट धरायला लावतो. या मोहिमेच्या माध्यमातून लोकांनी त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण अनुभवावेत आणि आपलेपणाची अनुभूती मिळवावी, हा आमचा उद्देश आहे.”

ही मोहिम केवळ एका चित्रफितीपुरती मर्यादित नसून, ती व्यापक स्वरुपात समोर येत आहे. गोदरेज प्रॉपर्टीजच्या विविध प्रकल्पांमधील जवळपास शंभरहून अधिक घरमालकांचे अनुभवही पाहायला मिळतील. गोदरेज प्रॉपर्टीजच्या गृहनिर्माण प्रकल्पांचे निवासी आपल्या आयुष्यातील खास आठवणी, महत्त्वाचे टप्पे, आनंदाचे क्षण मोकळेपणाने मांडत आहे. गोदरेजमधील स्वतःच्या नव्या घरात साजरी होणा-या पहिल्यावहिल्या दिवाळीचा उत्साह आणि आनंद व्यक्त करत आहेत.

भारतातील विविध राज्यांतील लोकसंस्कृती लक्षात घेत ही मोहिम विविध प्रादेशिक भाषांमध्ये पाहायला मिळेल. यामध्ये मराठीसह बंगाली, तेलुगू आणि कन्नड या प्रमुख भाषांचा समावेश करण्यात आला आहे. वेगवेगळ्या स्थानिक संस्कृतींचा आदर बाळगत या मोहिमेची आखणी करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील प्रेक्षकांशी जिव्हाळ्याचे आणि हक्काचे नाते निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande