टीसीएस प्रकरणी इम्तियाज जलील यांच्यावर नाशिक पोलिसांकडून गुन्हा दाखल
Nashik Police registers case against Imtiaz Jaleel in TCS case
Nashik Police registers case


माजी खासदार आरोपीच्या पिंजऱ्यात

नाशिक, 06 नोव्हेंबर (हिं.स.)।

: टीसीएस धर्मातर आणि लैंगिक शोषण प्रकरणात एमआयएम नेते, माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

टीसीएस लैंगिक छळ व धर्मांतर प्रकरणातून नव्या घडामोडी समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिला गेला होता. तिला मदत करणारे एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांची आतापर्यंत विशेष तपास पथकाने तीन वेळा चौकशी केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी मतीन पटेल याचा फोन जप्त केला असता, त्यात काही धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग मिळून आल्या. तपासादरम्यान इम्तियाज जलील यांचे नाव समोर आल्याने पोलिसांनी त्यांचे आवाजाचे नमुने देखील घेतले आहेत. या प्रकरणी जलील यांच्याविरोधात भक्कम पुरावे हाती लागल्याचा दावा पोलीस सूत्रांनी केला आहे.

जलील यांच्या विरोधात पुरावे असल्याने पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटीच्या माध्यमातून तपास सुरू आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांना पुढील चौकशीसाठी आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी उपस्थित राहावे लागणार आहे निदा खानला आश्रय दिल्या प्रकरणात इम्तियाज जलील यांच्या सहभागाबद्दल एसआयटीने न्यायालयाला माहिती दिली.

नाशिकच्या टीसीएस धर्मांतर प्रकरणातील गुन्हा दाखल झाल्यानंतर निदा खान फरारी झाली होती. त्यानंतर तिच्यावर छत्रपती संभाजीनगर पोलिसांचे बारीक लक्ष होते. निदा खान ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळून आली. फरारी झाल्यानंतर निदा खान ही तिच्या मावशीच्या संपर्कात होती, तर तिच्या मावशीच्या संपर्कात एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल होता. मतीन पटेल हा निदा खानची माहिती घेत होता. निदा खान ही गुन्हा दाखल झाल्यानंतर ४० दिवसांपासून फरारी होती. त्यानंतर तिला छत्रपती संभाजीनगरच्याा नारेगाव परिसरात अटक करण्यात आली होती. निदा ही नारेगावात आई, वडील, मावशी आणि इतर व्यक्ती आणि ती स्वतः राहत होती. घरात एकूण पाच जण राहत होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande