धनत्रयोदशीनंतर सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात घसरण
नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर (हिं.स.)। धनत्रयोदशीचा सण संपताच नरक चतुर्दशीच्या दिवशी शनिवारी देशांतर्गत सराफा बाजारात घसरणीचे चित्र पाहायला मिळाले. सोन्या-चांदीच्या दरात कमजोरी आल्याने देशातील बहुतांश सराफा बाजारपेठांमध्ये सोन्याचे दर प्रति १० ग्रॅममाग
Bullion Market Gold Silver


नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर (हिं.स.)। धनत्रयोदशीचा सण संपताच नरक चतुर्दशीच्या दिवशी शनिवारी देशांतर्गत सराफा बाजारात घसरणीचे चित्र पाहायला मिळाले. सोन्या-चांदीच्या दरात कमजोरी आल्याने देशातील बहुतांश सराफा बाजारपेठांमध्ये सोन्याचे दर प्रति १० ग्रॅममागे २ हजार ३७० रुपयांपासून ते २ हजार ५८० रुपयांपर्यंत घसरले आहेत. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही आज सुरुवातीच्या व्यवहारात प्रति किलो ५ हजार २०० रुपयांपर्यंत घसरण नोंदवण्यात आली आहे.

दरातील बदलामुळे देशातील विविध सराफा बाजारपेठांमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ४३ हजार ४५० रुपये ते १ लाख ४३ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १ लाख ३१ हजार ४९० रुपये ते १ लाख ३१ हजार ६४० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही घसरण झाल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात आज चांदीचा दर प्रति किलो २ लाख ४ हजार ९०० रुपयांवर आला आहे.

दिल्लीमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ४३ हजार ६०० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३१ हजार ६४० रुपये नोंदवण्यात आला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये २४ कॅरेट सोने १ लाख ४३ हजार ४५० रुपये आणि २२ कॅरेट सोने १ लाख ३१ हजार ४९० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे. त्याचप्रमाणे अहमदाबादमध्ये २४ कॅरेट सोन्याचा किरकोळ दर १ लाख ४३ हजार ५०० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३१ हजार ५४० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवण्यात आला आहे.

या प्रमुख शहरांव्यतिरिक्त चेन्नईमध्ये आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १ लाख ४३ हजार ४५० रुपये आणि २२ कॅरेट सोने १ लाख ३१ हजार ४९० रुपये दराने विकले जात आहे. कोलकातामध्येही २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४३ हजार ४५० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३१ हजार ४९० रुपये आहे. भोपाळमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत १ लाख ४३ हजार ५०० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३१ हजार ५४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

जयपूरमध्ये २४ कॅरेट सोने १ लाख ४३ हजार ६०० रुपये आणि २२ कॅरेट सोने १ लाख ३१ हजार ६४० रुपये दराने विकले जात आहे. पाटणा येथे २४ कॅरेट सोन्याची किंमत १ लाख ४३ हजार ५०० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३१ हजार ५४० रुपये आहे. चंदीगडमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४३ हजार ६०० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३१ हजार ६४० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवण्यात आला आहे. लखनौच्या सराफा बाजारातही २४ कॅरेट सोने १ लाख ४३ हजार ६०० रुपये आणि २२ कॅरेट सोने १ लाख ३१ हजार ६४० रुपये दराने विकले जात आहे.

देशातील इतर राज्यांप्रमाणेच कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशाच्या सराफा बाजारपेठांमध्येही आज सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. या तिन्ही राज्यांच्या राजधानी असलेल्या बंगळुरू, हैदराबाद आणि भुवनेश्वरमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ४३ हजार ४५० रुपये आहे. त्याचप्रमाणे या तिन्ही शहरांमध्ये २२ कॅरेट सोने १ लाख ३१ हजार ४९० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande