एअरटेलची एआय-संचालित ‘फ्रॉड अलर्ट’ सेवा लाँच
मुंबई, 11 फेब्रुवारी (हिं.स.)। स्पॅम कॉल्स आणि डिजिटल फ्रॉडच्या वाढत्या धोक्याला आळा घालण्यासाठी भारती एअरटेलने एक नावीन्यपूर्ण एआय-संचालित ‘फ्रॉड अलर्ट’ सुविधा लाँच केली आहे. ही अत्याधुनिक सेवा विशेषतः बँकिंग ओटीपी (वन-टाइम पासवर्ड) संबंधित फसवणु
Airtel launches AI-powered Fraud Alert service


मुंबई, 11 फेब्रुवारी (हिं.स.)। स्पॅम कॉल्स आणि डिजिटल फ्रॉडच्या वाढत्या धोक्याला आळा घालण्यासाठी भारती एअरटेलने एक नावीन्यपूर्ण एआय-संचालित ‘फ्रॉड अलर्ट’ सुविधा लाँच केली आहे. ही अत्याधुनिक सेवा विशेषतः बँकिंग ओटीपी (वन-टाइम पासवर्ड) संबंधित फसवणुकीपासून ग्राहकांना रिअल-टाइम संरक्षण देणार आहे. सायबर गुन्हेगार अनेकदा डिलिव्हरी, कस्टमर केअर किंवा इतर दैनंदिन सेवांच्या नावाखाली कॉल करून ग्राहकांकडून बँकिंग ट्रान्झॅक्शनचे ओटीपी मागवतात, ज्यामुळे खात्यांतील पैश्याना धोका निर्माण होऊ शकतो किंवा खाते रिकामी होऊ शकते. यासाठी एअरटेलची ही नवी प्रणाली अशा प्रकारच्या फसवणुकीला वेळेत रोखण्यास मदत करणार आहे.

ही एआय-संचालित सुविधा नेटवर्क स्तरावर स्वयंचलितपणे कार्य करते. एखाद्या संशयास्पद इनकमिंग कॉलदरम्यान जर ग्राहकाला बँकिंग ओटीपी मिळाला, तर प्रणाली लगेच त्याची ओळख करते आणि ग्राहकाला ‘फ्रॉड अलर्ट’ पाठवते. या अलर्टद्वारे कॉल सुरू असतानाच ओटीपी शेअर करणं धोकादायक असल्याची स्पष्ट सूचना दिली जाते. एआय तंत्रज्ञान आणि मानवी निर्णयशक्ती यांच्या संयोजनामुळे फ्रॉडस्टर्सनी निर्माण केलेली सुरक्षेतील पोकळी प्रभावीपणे भरून काढता येणार आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना एअरटेल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शश्श्वत शर्मा यांनी सांगितले की, एअरटेलला देशातील सर्वात सुरक्षित नेटवर्क बनवण्याची मोहीम सुरू आहे. डिजिटल व्यवहारांमध्ये ओटीपीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असली, तरी गुन्हेगारांच्या नव्या युक्त्यांमुळे त्याचा गैरवापर होत आहे. त्यामुळे नेटवर्क स्तरावर बँकिंग फ्रॉडविरुद्ध मजबूत संरक्षण प्रणाली सुरू करण्यात आली आहे. व्यापक चाचण्यांमध्ये या यंत्रणेची अचूकता आणि परिणामकारकता सिद्ध झाली असल्याचं त्यांनी नमूद केलं.

गेल्या दोन वर्षांत एअरटेलनं एआय-संचालित स्पॅम कॉल ब्लॉकिंग, संशयास्पद लिंक फिल्टरिंग यांसारखे अनेक उपाय राबवले असून त्यामुळे फ्रॉडमध्ये मोठी घट झाली आहे. तरीही सामाजिक अभियांत्रिकी आणि impersonationच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीला रोखण्यासाठी ही नवी ओटीपी संरक्षण सेवा महत्त्वाची ठरणार आहे. ही सुविधा सध्या हरियाणामध्ये सुरू झाली असून पुढील दोन आठवड्यांत देशभरातील 100 टक्के एअरटेल ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. ही सेवा ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande