क्लीनमॅक्स एनर्जीचा आयपीओ २३ फेब्रुवारीपासून होणार खुला
मुंबई, 18 फेब्रुवारी (हिं.स.)। भारतातील आघाडीची व्यावसायिक आणि औद्योगिक (C&I) अक्षय ऊर्जा पुरवठादार कंपनी क्लीनमॅक्स एनव्हायरो एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडने आपल्या पहिल्या सार्वजनिक विक्रीसाठी आयपीओ जाहीर केला असून तो २३ फेब्रुवारी २०२६ रोजी गुंत
Cleanmax Enviro Energy Solutions Limited IPO


मुंबई, 18 फेब्रुवारी (हिं.स.)। भारतातील आघाडीची व्यावसायिक आणि औद्योगिक (C&I) अक्षय ऊर्जा पुरवठादार कंपनी क्लीनमॅक्स एनव्हायरो एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडने आपल्या पहिल्या सार्वजनिक विक्रीसाठी आयपीओ जाहीर केला असून तो २३ फेब्रुवारी २०२६ रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. कंपनीने प्रति इक्विटी शेअर १००० ते १०५३ रुपये असा किंमतपट्टा निश्चित केला असून दर्शनी मूल्य १ रुपया आहे. हा आयपीओ २५ फेब्रुवारी २०२६ रोजी बंद होणार आहे. गुंतवणूकदारांना किमान १४ शेअर्ससाठी आणि त्यानंतर १४ च्या पटीत बोली लावता येणार आहे.

या आयपीओमध्ये १२ कोटी रुपयांपर्यंतचा नवीन इश्यू आणि १९ कोटी रुपयांपर्यंतचा ऑफर-फॉर-सेल समाविष्ट आहे. प्रवर्तक कुलदीप जैन, BGTF One Holdings (DIFC) Limited आणि KEMPINC LLP यांच्यासह Augment India I Holdings, LLC आणि DSDG Holding APS हे विक्री करणारे भागधारक आहेत. नवीन इश्यूमधून मिळणाऱ्या सुमारे १,१२२.६ कोटी रुपयांचा वापर कंपनी आणि तिच्या उपकंपन्यांच्या कर्जफेडीसाठी तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी केला जाणार आहे. आयपीओपूर्वी कंपनीने १५०० कोटी रुपये उभारण्यात यश मिळवले असून त्यात Jongsong Investments Pte. Ltd., GSS India Opportunities AIF Scheme I, 360 ONE Special Opportunities Fund आणि Steadview Capital Mauritius Limited यांसारख्या जागतिक गुंतवणूकदारांचा सहभाग आहे.

क्रिसिलच्या अहवालानुसार ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत २.८० गिगावॅट कार्यान्वित व व्यवस्थापित क्षमतेसह क्लीनमॅक्स ही देशातील सर्वात मोठी C&I अक्षय ऊर्जा कंपनी आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओपैकी सुमारे ४३ टक्के हिस्सा डेटा सेंटर आणि एआय ग्राहकांकडून येतो. ॲमेझॉन, ॲपल, सिस्को आणि गुगल यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या तसेच बजाज ऑटो आणि ग्रासिम इंडस्ट्रीज हे तिचे प्रमुख ग्राहक आहेत. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कंपनीचा महसूल १,४९५.७० कोटी रुपयांवर पोहोचला असून EBITDA १,०१५.०७ कोटी रुपये झाला आहे. या आयपीओचे बुक-रनिंग लीड मॅनेजर्स म्हणून ॲक्सिस कॅपिटल, जे.पी. मॉर्गन इंडिया, बीएनपी पारिबा, एचएसबीसी सिक्युरिटीज, आयआयएफएल कॅपिटल, नोमुरा, बीओबी कॅपिटल आणि एसबीआय कॅपिटल कार्यरत आहेत. कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande