तिसऱ्या व्यक्तीच्या येण्याने सत्या - मंजू वेगळे होणार ? प्रेक्षकांचा मंजूला पाठिंबा
मुंबई, 18 फेब्रुवारी (हिं.स.)। ''सन मराठी''वरील ''इन्स्पेक्टर मंजू'' ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे. मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे मालिकेची रंगत वाढली आहे. काही दिवसांपूर्वी सत्या निर्दोष असल्याचं मंजूला कळतं. पण याबाबत क
मंजू


मुंबई, 18 फेब्रुवारी (हिं.स.)। 'सन मराठी'वरील 'इन्स्पेक्टर मंजू' ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे. मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे मालिकेची रंगत वाढली आहे. काही दिवसांपूर्वी सत्या निर्दोष असल्याचं मंजूला कळतं. पण याबाबत काही ठोस पुरावे मंजूच्या हाती लागत नाही. सत्या व मंजूच नातं पूर्वीसारखं झालं असल्याने मम्मीसाहेब या दोघांना दूर करण्यासाठी कट रचते. सत्या- मंजूच नातं मजबूत असल्यानेमम्मी साहेबांचा कोणताच कट सफल होत नाही. अश्यातच मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांच्या मनातील धाकधूक वाढवली आहे. प्रोमोमध्ये मंजू एका वृद्ध व्यक्तीला धडकते व त्यांची माफी मागते. पण ही वृद्ध व्यक्ती नसून सत्या- मंजूच्या प्रेमाला ग्रहण लावण्यासाठी आलेली व्यक्ती आहे. व्हॅलेंटाईन दिवशी देखील मंजूला फुलं पाठवून एका व्यक्तीने त्याचं मंजूवर असलेलं प्रेम व्यक्त केलं होत. मंजूला मिळवण्यासाठी त्या व्यक्तीचे प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

या दोघांच्या आयुष्यात येणारा हा तिसरा व्यक्ती नक्की आहे तरी कोण? यामध्ये मम्मी साहेबांचा हात असेल का? तिसऱ्या व्यक्तीच्या येण्याने सत्या मंजू वेगळे होऊ शकतील का? मंजूच्या जीवाला धोका असेल का? या सर्व प्रश्नांची उत्तर पुढील भागात पाहणं रंजक ठरणार आहे. या प्रोमोला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. प्रेक्षकांनी कमेंट करत म्हंटल आहे की, कितीही झाले आणि कोणीही आले तरी मंजू सत्याचीच आहे. विषय संपला. तर एका प्रेक्षकांनी म्हंटलय, साताऱ्याच्या वाघिणीची शिकार करणे एवढं सोप्पे नाही...सत्या मंजू लवकरच एकत्र येतील. यांसारख्या कमेंट करत प्रेक्षकांनी सत्या- मंजूच्या जोडीवर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. आता पुढील भागात नेमकं काय घडणार, हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल. 'इन्स्पेक्टर मंजू' ही मालिका दररोज रात्री ८ वाजता 'सन मराठी' वाहिनीवर दाखवली जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande