बीडमध्ये १ मार्च रोजी महारक्तदान शिबिर
बीड, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।रोटरी परिवार बीड आणि १६ विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत एक मार्चला बीडमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा हा एक पवित्र आणि सामाजिक बांधीलकी जपणारा उपक्रम असून जास्तीत जास्त दात्यां
बीडमध्ये १ मार्च रोजी महारक्तदान शिबिर


बीड, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।रोटरी परिवार बीड आणि १६ विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत एक मार्चला बीडमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा हा एक पवित्र आणि सामाजिक बांधीलकी जपणारा उपक्रम असून जास्तीत जास्त दात्यांनी या सामाजिक कार्यात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एक मार्च रोजी सकाळी दहा ते दुपारी अडीच वाजेदरम्यान शहरातील सहयोग नगर येथील स्वामी समर्थ केंद्राच्या बाजूला गुरुनानक दरबार येथे हे शिबिर होणार आहे. या शिबिराचे प्रोजेक्ट चेअरमन अक्षय शेटे सीए आदेश नहार, सचिन लातूरकर हे असतील.

सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम असून दात्यांनी यात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रोटरी क्लब ऑफ बीड, रोटरी क्लबऑफ बीड मिडटाऊन, रोटरी क्लब ऑफ बीड सिटी, माहेश्वरी प्रगती मंडळ, बीड जिल्हा सीए अॅन्ड टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन, साळीराम अण्णा ढोले पाटील फाउंडेशन, स्वराज्य मुद्रा सामाजिक प्रतिष्ठान, बीड जिल्हा व्यापारी संघटना, गौतम लब्धी फाउंडेशन, योगा दीपमाळ ग्रुप, बीड शहर व्यापारी संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन, बीड जिल्हा सिव्हिल कन्सल्टिंग इंजिनिअरिंग असोसिएशन, शेतकरी राजा सामाजिक समिती, महाराष्ट्र वैद्यकीय प्रतिनिधी संघटना यांच्यावतीने या शिबिराचे आयोजन केले आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande