सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती निवडीचे पत्र जारी
सोलापूर, 26 फेब्रुवारी (हिं.स.)सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती पदांच्या निवडीबाबत ग्रामविकास मंत्रालयाने अधिकृत पत्र जारी केले आहे.सदर निवड प्रक्रिया येत्या २० मार्चप
ZP news solpaur


सोलापूर, 26 फेब्रुवारी (हिं.स.)सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती पदांच्या निवडीबाबत ग्रामविकास मंत्रालयाने अधिकृत पत्र जारी केले आहे.सदर निवड प्रक्रिया येत्या २० मार्चपूर्वी पूर्ण करावी, अशा स्पष्ट सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.

आता ‘कोणाच्या गळ्यात माळ पडणार?’ याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय समीकरणे जुळवण्याची धावपळ सुरू झाली असून पुढील काही दिवस जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये चांगलीच चुरस रंगण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande