अवकाळी पावसाने सुरगाणा तालुक्यातील आंबा मोहोर जळाला; नुकसानभरपाईची मागणी
सुरगाणा, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। सुरगाणा तालुक्यात आंबा लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. मात्र मागील तीन-चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे व सततच्या ढगाळ वातावरणामुळे आंब्याचा मोहोर मोठ्या प्रमाणावर जळून गेला असून परिणामी यंदाच्या हंगामाती
अवकाळी पावसाने सुरगाणा तालुक्यातील आंबा मोहोर जळाला; नुकसानभरपाईची मागणी


सुरगाणा, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। सुरगाणा तालुक्यात आंबा लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. मात्र मागील तीन-चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे व सततच्या ढगाळ वातावरणामुळे आंब्याचा मोहोर मोठ्या प्रमाणावर जळून गेला असून परिणामी यंदाच्या हंगामातील उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची होणार आहे.

अनेक शेतकऱ्यांनी सांगितले आंबा बागांना अवकाळी पावसाचा फटका बसला. ओलसर हवामान आणि तापमानातील बदलामुळे मोहोर गळून पडला. त्यामुळे फळधारणा होण्याची शक्यता कमी झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्यातील बहुतांश बागायती शेतकरी आंबा पिकावर अवलंबून आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला हंगाम वाया गेला असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतपातळीवर पाहणी करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया

आम्ही संपूर्ण वर्षभर आंबा बागेची काळजी घेतो. पण अवकाळी पावसामुळे व ढगाळ हवामानामुळे मोहोर जळून गेला. आता सरकारने तातडीने मदत करावी.

श्री नितिन धूम

शेतकरी पळसन

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande