सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई
सोलापूर, 26 फेब्रुवारी (हिं.स.) अल्पवयीन मुलाच्या हाती दुचाकी आढळल्यास त्याच्या पालकास दहा हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. वाहनाचा विमा नसल्यास दोन हजार रुपयांचा स्वतंत्र दंड आकारला जातो. सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी मागील महिनाभरात चार दुचाकींच्य
सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई


सोलापूर, 26 फेब्रुवारी (हिं.स.) अल्पवयीन मुलाच्या हाती दुचाकी आढळल्यास त्याच्या पालकास दहा हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. वाहनाचा विमा नसल्यास दोन हजार रुपयांचा स्वतंत्र दंड आकारला जातो. सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी मागील महिनाभरात चार दुचाकींच्या मूळ मालकांवर अशा प्रकारची कारवाई केली आहे. दंड जागेवरच भरून वाहन त्यांच्या ताब्यात दिले जाते, पालकास समज देऊन सोडण्यात येते आणि पुढील कारवाईसाठी खटला न्यायालयात पाठविला जातो, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन दिल्यास मूळ मालकास एकूण दहा हजार रुपयांचा दंड होतो. तरीही शहरातील शेकडो पालक आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी व चारचाकी वाहने बिनधास्तपणे देत आहेत. ही मुले शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेससाठी ये-जा करतात. रस्त्यांवरील वाढती वाहतूक आणि गोंधळामुळे त्यांचे लक्ष विचलित होऊन अपघात घडतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई तीव्र केली असून संबंधित मुलांच्या पालकांना बोलावून थेट दंड वसूल केला जात आहे. शहरातील सिग्नलवर तैनात पोलिसांनाही अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande