अधिकृत आधार केंद्रे गुगल मॅप्सवर दर्शविण्यासाठी युआयडीएआयची गुगलशी हातमिळवणी
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी (हिं.स.) - देशभरातील रहिवाशांना अधिक सुलभ आणि सोयीचे व्हावे यासाठी अधिकृत आधार केंद्रे गुगल मॅप्सवर दर्शविली जावीत यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युआयडीएआय) गुगलबरोबर हातमिळवणी केली आहे. या उपक्रमामुळे रहिवाशांना
युआयडीएआय गुगल


नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी (हिं.स.) - देशभरातील रहिवाशांना अधिक सुलभ आणि सोयीचे व्हावे यासाठी अधिकृत आधार केंद्रे गुगल मॅप्सवर दर्शविली जावीत यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युआयडीएआय) गुगलबरोबर हातमिळवणी केली आहे.

या उपक्रमामुळे रहिवाशांना प्रौढांची तसेच मुलांची नोंदणी करण्यासाठी किंवा फक्त पत्ता आणि मोबाईल क्र. अशी माहिती अद्ययावत करणे अशा कामांसाठी जिथे या स्वरूपाच्या सेवा देऊ केल्या जातात अशा आधार केंद्रांची माहिती घेऊन त्यानुसार निवड करण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त ज्याठिकाणी आवश्यक असेल तिथे केंद्रात उपलब्ध असलेल्या दिव्यांगांना-सोयीच्या पायाभूत सुविधा तसेच पार्किंगच्या सुविधा, कामकाजाच्या वेळा यांसारख्या सुविधांशी संबंधित माहिती दर्शविली गेल्यास रहिवाशांसाठी ते अधिक सोयीचे होईल.

येत्या काही महिन्यांत ही सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

जनतेला अधिक सोयीचे व्हावे, चुकीच्या माहितीला प्रतिबंध व्हावा आणि देशभरातील अत्याधुनिक आधार सेवा केंद्रांसह (एएसके) 60,000 हून अधिक आधार केंद्रे नागरिकांना विनासायास उपलब्ध व्हावीत या अनुषंगाने या सहकार्याची आखणी केली गेली आहे. यामुळे जेव्हा वापरकर्ते गुगल मॅप्सवर शोध घेतील तेव्हा त्यांना खात्रीशीर आधार केंद्रांचा ठावठिकाणा दाखविला जाईल हे सुनिश्चित होईल.

आधार क्रमांक धारकांचे जीवनमान सुकर करणे हे युआयडीएआयने नेहमीच केंद्रस्थानी ठेवले आहे. या सहकार्यामुळे अधिकृत आधार केंद्रांचा पत्ता शोधणे आता सोपे, जलद आणि अधिक पारदर्शक होईल, असे युआयडीएआयने चे सीईओ भुवनेश कुमार यांनी सांगितले.

सहकार्याच्या पुढील टप्प्यात, युआयडीएआय केंद्राची माहिती व्यवस्थापित करण्यासाठी आणि लोकांच्या अभिप्रायाला थेट प्रतिसाद देण्यासाठी गुगल बिझनेस प्रोफाइलचा वापर करेल, त्यामुळे पारदर्शकता आणि प्रतिसादात्मक सेवा परिसंस्था सुनिश्चित होईल.

भविष्याकडे पाहता, ही भागीदारी गुगल मॅप्स इंटरफेसद्वारे थेट अपॉइंटमेंट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या शक्यतेची पडताळणी करेल, त्यामुळे रहिवाशांना अधिक कार्यक्षमपणे त्यांच्या भेटींचे नियोजन करता येईल.

यूआयडीएआय सत्यापित आधार केंद्रांसोबत जोडले जाऊन, आम्ही लाखो रहिवाशांचे विश्वासार्ह सेवा शोधून काढण्याचे काम सोपे करत आहोत तसेच ज्यांना आवश्यक सरकारी पायाभूत सुविधा उपलब्ध होण्याची सर्वात जास्त गरज आहे त्यांना भासणारी त्यांची कमतरता आम्ही भरून काढत आहोत, असे गुगल इंडियाच्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपच्या कंट्री हेड रोली अग्रवाल म्हणाल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande