शक्तिपीठ महामार्गास विरोध केल्यास होणार कारवाई
सोलापूर, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। पवनार ते पत्रादेवी (नागपूर-गोवा) शक्तिपीठ महामार्गासाठी बार्शी तालुक्यातील नऊ गावांमध्ये भूसंपादन केले जाणार आहे. त्याला विरोध दर्शविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, हा
express


सोलापूर, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।

पवनार ते पत्रादेवी (नागपूर-गोवा) शक्तिपीठ महामार्गासाठी बार्शी तालुक्यातील नऊ गावांमध्ये भूसंपादन केले जाणार आहे. त्याला विरोध दर्शविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, हा आदेश आजपासून मोजणी पूर्ण होईपर्यंत लागू करण्यात आला. शक्तिपीठ महामार्गासाठी आवश्यक त्या गटांमधील मोजणीची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत केली जाणार आहे.बार्शी तालुक्यातील संबंधित नऊ गावांतील काही शेतकऱ्यांचा व अन्य काही लोकांचा शक्तिपीठ महामार्गास विरोध असून या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया रद्द करण्याविरूद्ध ग्रामस्थ आंदोलने करत आहेत. परंतू या भूसंपादन प्रक्रियेला विरोध नसलेल्या शेतकऱ्यांना जाणून बुजून त्रास देण्याच्या उद्देशाने व भूसंपादन प्रक्रिया थांबविण्यासाठी प्रोत्साहन करत असल्याच्या मुद्यांवरून सोलापूर क्र. 1 चे उपविभागीय दंडाधिकारी सदाशिव पडदुणे यांनी सोलापूर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 चा आदेश लागू केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande