आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करावी - जयंत पाटील
मुंबई, 28 फेब्रुवारी (हिं.स.) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या ३६ तासांच्या वाहतूक कोंडीवर आज विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. या चर्चेदरम्यान आपत्कालीन परिस्थिती मदत करण्यासाठी हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी राष
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करावी - जयंत पाटील


मुंबई, 28 फेब्रुवारी (हिं.स.) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या ३६ तासांच्या वाहतूक कोंडीवर आज विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. या चर्चेदरम्यान आपत्कालीन परिस्थिती मदत करण्यासाठी हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील यांनी केली.

जयंतराव पाटील म्हणाले की, विकास साधताना नवीन प्रश्न तयार होता असतात. महामार्ग अतिशय झपाट्याने आपण उभारतोय, मात्र तेवढीच वाहतूक कोंडी वाढते आहे. अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती मदत करण्यासाठी हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करण्यात यावी. मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर २४ तास अलर्ट मोडवर अशी व्यवस्था करण्यात यावी. पुणे अपघात आणि ३८ तास झालेल्या वाहतूक कोंडी यामुळे ही गरज प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन या रस्त्यांच्या संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांसह उपाययोजना करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.

यावर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमचा वापर करून जलद गतीने प्रवाशांना माहिती पोहचवण्याचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंतराव पाटील यांना दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande