पोखरण फायरिंग रेंजमधील 'वायु शक्ती' सरावाला राष्ट्रपतींची उपस्थिती
मुंबई, 28 फेब्रुवारी (हिं.स.) - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल (27 फेब्रुवारी) राजस्थानमधील जैसलमेर येथे पोखरण फायरिंग रेंजमध्ये ''वायु शक्ती-2026'' सरावाचे निरीक्षण केले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए
वायु शक्ती


वायु शक्ती


वायु शक्ती


वायु शक्ती सराव राष्ट्रपती


मुंबई, 28 फेब्रुवारी (हिं.स.) - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल (27 फेब्रुवारी) राजस्थानमधील जैसलमेर येथे पोखरण फायरिंग रेंजमध्ये 'वायु शक्ती-2026' सरावाचे निरीक्षण केले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंह उपस्थित होते.

वायु शक्ती-2026 ने, भारतीय हवाई दलाचे धैर्य, समर्पण आणि व्यावसायिक उत्कृष्टतेचे दर्शन घडवले. युद्धाप्रमाणे काल्पनिक परिस्थितीत जलद आणि अचूक प्रहार करण्याची क्षमता प्रदर्शित करण्याच्या प्राथमिक उद्देशाने हा सराव आयोजित करण्यात आला होता. विविध लढाऊ विमाने, वाहतूक करणारी विमाने आणि लढाऊ हेलिकॉप्टर यांनी या सरावात निर्धारित लक्ष्याचा अचूक वेध घेतला.

विमानांची गर्जना आणि वाळवंटातील अचूक बॉम्बफेक, याने भारतीय हवाई दलाच्या आधुनिक लढाऊ सामर्थ्याचे आणि परिचालन सज्जतेचे सुस्पष्ट दर्शन घडवले. राफेल, सुखोई एसयू -30 एमकेआय, एचएएल तेजस आणि मिराज 2000 सह भारतीय हवाई दलाच्या प्रगत लढाऊ विमानांनी हवेतून जमिनीवर मारा करणारे बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून शत्रूच्या बंकर, धावपट्ट्या आणि कमांड सेंटरचे अचूक लक्ष्य साधले. बोईंग अपाचे आणि बोईंग चिनूक हेलिकॉप्टरने कमी उंचीवरील रॉकेट आणि गन फायरिंग ड्रिल, जखमींची सुटका ऑपरेशन्स आणि आव्हानात्मक युद्धभूमीवरील उपकरणांची वाहतूक याची प्रात्यक्षिके देखील केली.

अग्निशक्तीच्या प्रदर्शनाव्यतिरिक्त, 'वायु शक्ती- 2026' हे तंत्रज्ञान, एकात्मता आणि जलद प्रतिसाद क्षमतांचे समन्वित प्रदर्शन देखील आहे. या सरावाने दिवसा आणि रात्री अशा दोन्ही परिस्थितीत लढाऊ मोहिमांसाठीची सज्जता दर्शवली. तसेच हवाई क्षेत्रातील श्रेष्ठता, जमिनीवरील पाठबळ आणि लॉजिस्टिक सपोर्ट यांसारख्या युद्धकालीन मोहिमांची यशस्वी चाचणी केली. वायुशक्ती-2026 ने बहु-क्षेत्रीय दल आणि राष्ट्रीय प्रतिरोधक क्षमतेचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून भारतीय हवाई दलाची सज्जता अधोरेखित केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande