“महाराष्ट्राची हास्यजत्रेची रंगपंचमी – खेळ खेळूया होळीचा” उत्साहात संपन्न
मुंबई, 28 फेब्रुवारी, (हिं.स.)। सोनी मराठी वाहिनी आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमने यंदाची रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरी केली. “हस्यजत्रेची रंगपंचमी – खेळ खेळूया होळीचा” या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व कलाकार एकत्र येत रंग,
“महाराष्ट्राची हस्यजत्रेची रंगपंचमी – खेळ खेळूया होळीचा” उत्साहात संपन्न


मुंबई, 28 फेब्रुवारी, (हिं.स.)। सोनी मराठी वाहिनी आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमने यंदाची रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरी केली. “हस्यजत्रेची रंगपंचमी – खेळ खेळूया होळीचा” या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व कलाकार एकत्र येत रंग, संगीत आणि नृत्याच्या ठेक्यावर रंगपंचमीचा आनंद लुटला.

या रंगतदार सोहळ्यास कार्यक्रमाचे दिग्दर्शक व निर्माते सचिन गोस्वामी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, श्याम राजपूत, मंदार मांडवकर, शिवाली परब, रोहित माने, वनिता खरात, प्रथमेश शिवलकर ओंकार राऊत, अरुण कदम, निखिल बने, दत्तू मोरे आणि विराज जगताप हे सर्व कलाकार उपस्थित होते. सोबतच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमची संगीत टीमदेखील या उत्सवात सहभागी झाली होती.

या कार्यक्रमात कलाकारांनी गाणी गात, ठेका धरत आणि तुफान डान्स करत रंगांची उधळण केली. यासोबतच धमाल असे निरनिराळे गेम्सदेखील कलाकारांनी खेळले आणि एकमेकांसोबत हास्यविनोद करत रंगपंचमीचा आनंद द्विगुणित केला. पारंपरिक आणि धमाल गाण्यांवर सगळ्यांनी एकत्र येत रंगपंचमी साजरी केली. रंगांच्या उधळणीसोबत हास्याचा वर्षावही पाहायला मिळाला.

संपूर्ण वातावरणात उत्साह, मैत्री आणि आनंदाची रंगत पाहायला मिळाली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ परिवाराने एकत्र येत साजरी केलेली ही रंगपंचमी प्रेक्षकांसाठीही खास ठरली. सोबतच महाराष्ट्रातील आणि जगभरातील सगळ्या प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनी आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा टीम तर्फे होळी आणि रंगपंचमी च्या शुभेछया देखील दिल्या. या कार्यक्रमाची विशेष झलक महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाच्या येत्या भागात दाखवली जाणार आहे. तर पाहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोम आणि मंगळवार रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande