'तलास' चित्रपटातील धम्माल हळदी गीताचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न
मुंबई, 28 फेब्रुवारी, (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील आशयघन आणि उत्कंठावर्धक चित्रपटांनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ''तलास'' हा आगामी मराठी चित्रपटही प्रेक्षकांच्या मनात कुतूहल जागविणारा आहे. या चित्रपटाच्या कथानकात नेमके काय दडलेय याची
'तलास' चित्रपटातील धम्माल हळदी गीताचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न...


मुंबई, 28 फेब्रुवारी, (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील आशयघन आणि उत्कंठावर्धक चित्रपटांनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 'तलास' हा आगामी मराठी चित्रपटही प्रेक्षकांच्या मनात कुतूहल जागविणारा आहे. या चित्रपटाच्या कथानकात नेमके काय दडलेय याची कल्पना शीर्षकावरून अजिबात येत नाही. याउलट चित्रपटाचे शीर्षक उत्सुकता वाढविण्याचे काम करणारे आहे. नुकतेच या चित्रपटातील धम्माल गाण्याचे प्रकाशन करण्यात आले आहे.

निर्मात्या दीपा सावंत-खोत यांनी दीपतारांगण क्रिएशन्सच्या बॅनरखाली 'तलास' या रहस्यमय-रोमांचक चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'तलास'मध्ये प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री आहे. रहस्यमय घडामोडींची गुंतागुंत आणि अखेरीस होणारी रहस्याची उकल प्रेक्षकांना रोमांचक अनुभव देणारी आहे. उदय गणपत जाधव यांनी या चित्रपटाचे अभ्यासपूर्ण दिग्दर्शन केले असून, कथा आणि पटकथालेखनही त्यांनीच केले आहे. संवादलेखनाची जबाबदारी रुपाली कुटे यांनी सांभाळली आहे. गीतकार विजय गाडेकर यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केले असून, संगीत दिग्दर्शनही त्यांची केले आहे. दादर क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात 'तलास' चित्रपटामधील धम्माल गाण्याचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. हळदीच्या सोनसळी रंगात न्हालेलं हे ग्लॅमरस, जल्लोषमय आणि रॉयल थाटात साकारलेलं गीत प्रकाशित करण्यात आले. 'या गो बायांनो हळद घेऊनशी...' या गीतकार-संगीतकार विजय गाडेकर यांच्या लेखणीतून अवतरलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या गाण्यावर गौतमी पाटीलने नृत्य केले असून नृत्यदिग्दर्शन नरेंद्र पंडित यांनी केले आहे. महाराष्ट्राची लाडकी गायिका वैशाली सामंत यांनी हे गाणे गायले आहे.

या चित्रपटात चिन्मयी सुमित, गणेश यादव, प्रणव रावराणे, राहुल पाटील, पूजा जैस्वाल, निलेश भेरे, वेदांत खोत, रेखा राणे, अजय पाध्ये आणि गौतमी पाटील आदी कलाकार आहेत. डिओपी सचिन लोखंडे यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली आहे. कलादिग्दर्शन - अनिल केदार, वेशभूषा - धनश्री सालेकर, रंगभूषा - सुनील सावंत, छायाचित्रण - पंकज पटेल, पोस्ट प्रॉडकशन - संमित स्टूडियो, संकलन - सुबोध नारकर, ध्वनीआरेखन - विशाल राणे, कार्यकारी निर्माता - सदानंद टेंबुलकर, निर्मिती व्यवस्थापक - संदीप मोरे, डीआय कलरिस्ट - भूषण दळवी अशी श्रेयनामावली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande