जम्मू-काश्मीर: उधमपूरमध्ये सुरक्षा दल–दहशतवाद्यांमध्ये चकमक; परिसरात कडक बंदोबस्त
श्रीनगर , 03 फेब्रुवारी (हिं.स.)। जम्मू–काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील मजलता परिसरात सुरक्षा दल आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू आहे. परिसरात २ ते ३ दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण
जम्मू-काश्मीर: उधमपूरमध्ये सुरक्षा दल–दहशतवाद्यांमध्ये चकमक; परिसरात कडक बंदोबस्त


श्रीनगर , 03 फेब्रुवारी (हिं.स.)। जम्मू–काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील मजलता परिसरात सुरक्षा दल आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू आहे. परिसरात २ ते ३ दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण क्षेत्राला वेढा घातला आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सघन शोधमोहीम राबवली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, चिगला बलोटा भागात संशयास्पद हालचाली आढळून आल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराची घेराबंदी करत शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. संपूर्ण भागात अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले असून शोधमोहीम अद्याप सुरू आहे. चकमकीनंतर परिसरातील सतर्कता आणखी वाढवण्यात आली आहे.भारतीय लष्कराच्या व्हाईट नाइट कॉर्प्सने आपल्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवर या कारवाईची माहिती देताना म्हटले आहे, “गुप्तचर माहितीनुसार राबवण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत भारतीय लष्कर, जम्मू–काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या तुकड्यांनी आज सायंकाळी सुमारे चार वाजता बसंतगड परिसरातील सामान्य भागात दहशतवाद्यांशी संपर्क प्रस्थापित केला. यानंतर परिसराला वेढा घालून गोळीबार करण्यात आला. सध्या ही कारवाई सुरू आहे.”उल्लेखनीय म्हणजे, रविवारी रात्रीपासून जोफड भागातही संशयास्पद हालचालींच्या अहवालांनंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. उधमपूरच्या वरच्या भागांमध्ये दहशतवाद्यांच्या संभाव्य उपस्थितीच्या माहितीनंतर सुरक्षा दल पूर्णपणे सतर्क अवस्थेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande