
भाजपच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी झाली निवड
नवी दिल्ली, 03 फेब्रुवारी (हिं.स.) मणिपूर विधानसभा सदस्यांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपचे नेते युमनाम खेमचंद सिंह यांची विधीमंडळ पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. युमनाम खेमचंद सिंह हे मेतेई समुदायतील आहेत. ते सिंगजामेई विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.
युमनाम खेमचंद सिंह लवकरच मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. ते या पूर्वोत्तर राज्यातील भाजपचे दुसरे मुख्यमंत्री ठरतील. भाजप आमदारांचा एक गट दिल्लीला आला आणि विस्तृत चर्चेनंतर आमदारांनी युमनाम खेमचंद सिंह यांना नेता म्हणून निवडले.
युमनाम खेमचंद सिंह हे बहुसंख्य मेतेई समुदायाचे सदस्य असून, ते माजी ग्रामीण विकास मंत्री आहेत. ते 2017 आणि 2022 च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप उमेदवार म्हणून सिंगजामेई मतदारसंघातून मणिपूर विधानसभेसाठी निवडून आले होते.मणिपूरमध्ये मे 2023 मध्ये जातीय हिंसा सुरु झाल्यानंतर, सिंह यांनी अलीकडे आदिवासी बहुल पहाडी जिल्हे उखरुल आणि कामजोंग यांचे दौरे केले. हे क्षेत्रातील कोणत्याही मेतेई नेत्याचे पहिले भेटीचे दौरे होते.
विस्तृत चर्चेनंतर, भाजपने मणिपूरमध्ये नवीन मुख्यमंत्री निवड प्रक्रियेस सुरुवात केली. पक्षाच्या संसदीय बोर्डाने राष्ट्रीय महासचिव तरुण चुग यांना राज्यातील आमदार पक्ष नेत्याच्या निवडीसाठी केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केले. केंद्रीय भाजप नेतृत्वाच्या सूचनेनंतर, भाजप आणि त्याच्या सहयोगी पक्षांच्या मोठ्या संख्येने आमदारांनी या आठवड्याच्या सुरुवातीला नवी दिल्लीला भेट दिली.बीरेन सिंह, विधानसभा सभापती थोकचोम सत्यब्रत सिंह, खेमचंद सिंह आणि राज्य भाजप अध्यक्ष अधिकारिमायुम शारदा देवी हे राष्ट्रीय राजधानीत पक्षाच्या आमदारांसोबत उपस्थित होते.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी