आशियाई इनडोअर चॅम्पियनशिप : पहिल्या दिवशी तेजस्विन शंकरची चमकदार कामगिरी
नवी दिल्ली, 08 फेब्रुवारी (हिं.स.)आशियाई खेळांमध्ये पदक विजेता आणि राष्ट्रीय विक्रमवीर तेजस्विन शंकरने १२ व्या आशियाई इनडोअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये हेप्टाथलॉन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी उत्कृष्ट कामगिरी करत आपले अव्वल स्थान पक्के केले. चार स्पर
तेजस्विन शंकर


नवी दिल्ली, 08 फेब्रुवारी (हिं.स.)आशियाई खेळांमध्ये पदक विजेता आणि राष्ट्रीय विक्रमवीर तेजस्विन शंकरने १२ व्या आशियाई इनडोअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये हेप्टाथलॉन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी उत्कृष्ट कामगिरी करत आपले अव्वल स्थान पक्के केले. चार स्पर्धांनंतर, २७ वर्षीय खेळाडू एकूण ३,५१३ गुणांसह क्रमवारीत आघाडीवर आहे. चीनचा जिहुई हुआ ३,२४१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

डेकॅथलॉनमध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेल्या तेजस्विनने ६० मीटर शर्यतीत ७.११ सेकंदांच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह ८४४ गुणांची कमाई केली. त्याने ७.५३ मीटरच्या उडीसह लांब उडीत ९४२ गुण जोडले. त्यानंतर त्याने १३.६३ मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह शॉटपुटमध्ये ७०६ गुण मिळवले. दिवसाच्या चौथ्या आणि शेवटच्या स्पर्धेत, उंच उडीमध्ये, तेजस्विनने २.२३ मीटर ही हंगामातील सर्वोत्तम कामगिरी केली आणि १०२१ गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.

हेप्टाथलॉनच्या उर्वरित तीन स्पर्धा (६० मीटर अडथळा, पोल व्हॉल्ट आणि १००० मीटर) शेवटच्या दिवशी होतील. भारताची नित्या गांधी महिलांच्या ६० मीटर शर्यतीत ७.४९ सेकंदांच्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह सातव्या स्थानावर राहिली. तिने यापूर्वी हीट्समध्ये ७.५० सेकंद वेळ काढून अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती. भारताचे दोन अनुभवी खेळाडू, तेजिंदरपाल सिंग तूर आणि समरदीप सिंग गिल, अंतिम दिवशी पुरुषांच्या शॉट पुट स्पर्धेत भाग घेतील. आशियाई क्रीडा पदक विजेती अँसी सोजन महिलांच्या लांब उडी स्पर्धेत आव्हान देईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande