ऑल इंग्लंड ओपन २०२६: सात्विक आणि चिरागला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का
बर्मिंगहॅम, ५ मार्च (हिं.स.)सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय पुरुष दुहेरीच्या स्टार जोडीला ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या फेरीतच बाहेर पडावे लागले. भारतीय जोडीला मलेशियाच्या बिगरमानांकित आरोन ताई आणि कांग खाई झिंग यांच्
सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी


बर्मिंगहॅम, ५ मार्च (हिं.स.)सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय पुरुष दुहेरीच्या स्टार जोडीला ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या फेरीतच बाहेर पडावे लागले. भारतीय जोडीला मलेशियाच्या बिगरमानांकित आरोन ताई आणि कांग खाई झिंग यांच्याकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. आरोन-खाई झिंग या जोडीनं ४२ मिनिटांत २३-२१, २१-१२ असा विजय मिळवला. पहिला गेम चांगलाच चुरशीचा झाला, जो मलेशियन जोडीने २३-२१ असा जिंकला आणि त्यानंतर, त्यांना मागे वळून पाहावे लागले नाही, कारण त्यांनी दुसरा गेम २१-१२ असा जिंकला.

मिश्र दुहेरीत, भारताच्या रोहन कपूर आणि रुत्विका गड्डे यांना फ्रान्सच्या थॉम गिक्वेल आणि डेल्फीन डेलरू यांच्याकडून १२-२१, १५-२१ असा पराभव सहन करावा लागला. हा सामनाही ४२ मिनिटांत संपला.पुरुष एकेरीत, २० वर्षीय आयुष शेट्टीला जागतिक क्रमवारीत १४ व्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या अल्वी फरहानविरुद्ध तीन गेमचा सामना गमवावा लागला. आयुषने पहिला गेम २१-१९ असा जिंकला पण त्यानंतरचे दोन्ही गेम ९-२१ आणि १७-२१ असा गमावून स्पर्धेतून बाहेर पडला.ऑल इंग्लंड ओपन २०२६ मध्ये भारताची निराशाजनक सुरुवात झाली, प्रमुख खेळाडू पहिल्या फेरीतच बाहेर पडले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande