ग्राहकांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित बनविण्यासाठी एचडीएफसी लाइफ-मुथूट फिनकॉर्प लि.चा सहयोग
मुंबई, ८ फेब्रुवारी (हिं.स.) : भारताच्या काही अग्रगण्य जीवनविमा कंपन्यांपैकी एक एचडीएफसी लाइफने तिरुवनंतपुरम, केरळ येथे मुख्यालय असलेल्या मुथूट पप्पाचन ग्रुप (मुथूट ब्लु)ची प्रमुख कंपनी मुथूट फिनकॉर्प लि. बरोबर धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे.
HDFC life


मुंबई, ८ फेब्रुवारी (हिं.स.) : भारताच्या काही अग्रगण्य जीवनविमा कंपन्यांपैकी एक एचडीएफसी लाइफने तिरुवनंतपुरम, केरळ येथे मुख्यालय असलेल्या मुथूट पप्पाचन ग्रुप (मुथूट ब्लु)ची प्रमुख कंपनी मुथूट फिनकॉर्प लि. बरोबर धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे.

या भागीदारीमुळे मुथूट फिनकॉर्प लि.च्या ग्राहकांना एचडीएफसी लाइफच्या सामूहिक आणि वैयक्तिक जीवनविम्याचा सर्वसमावेशक संच उपलब्ध होणार आहे, ज्यात अनेक प्रकारच्या सुरक्षा योजना व दीर्घकालीन वित्तीय उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी आवश्यक दीर्घकालीन बचत उत्पादनांचाही समावेश असणार आहे. या विमा योजना मुथूट फिनकॉर्प लि.च्या भारतभरात कार्यरत ३७५० हून अधिक शाखांच्या विस्तारित नेटवर्कच्या तसेच कंपनीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या भागीदारीविषयी बोलताना एचडीएफसी लाइफच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ विभा पडळकर म्हणाल्या, “मुथूट फिनकॉर्प लि. बरोबरची आमची भागीदारी म्हणजे ‘2047 पर्यंत सर्वांना विमाकवच’ हे आमच्या उद्योगक्षेत्राचे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. मुथूट फिनकॉर्प लि.च्या विद्यमान तसेच नव्या मौल्यवान ग्राहकांना त्यांची दीर्घकालीन आर्थिक उद्दीष्टे पूर्ण करण्यास सक्षम बनविणाऱ्या परिणामकारक जीवनविमा योजना पुरविण्याप्रती आम्ही कटिबद्ध आहोत. इतकेच नव्हे, तर आमच्या कार्यप्रक्रियांच्या विनाखंड एकत्रीकरणामुळे मुथूट फिनकॉर्प लि.च्या सर्व संपर्कबिंदूपाशी कार्यरत टीम्सना डिजिटली सक्षम बनविण्याची काळजी घेतली जाईल, जेणेकरून हा अनुभव त्यांच्यासाठी तसेच त्यांच्या ग्राहकांसाठीही आनंददायी ठरावा. या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही जीवनविम्याची पोहोच विस्तारण्यास व देशामध्ये आर्थिक समावेशकतेला चालना देण्यास उत्सुक आहोत.”

मुथूट फिनकॉर्प लि. चे सीईओ श्री. शाजी व्हर्गिस म्हणाले, “एचडीएफसी लाइफ बरोबर हातमिळवणी करताना आम्हाला आनंद होत आहे. मुथूट फिनकॉर्प लि. आणि एचडीएफसी लाइफ या दोन्ही संस्था ग्राहकांच्या गहिऱ्या विश्वासाच्या आधारे उभ्या राहिल्या आहेत. ही भागीदारी ३,७५० हून अधिक शाखा, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, लाखो ग्राहकांबरोबरचे आमचे सखोल नाते तसेच एचडीएफसी लाइफची उत्पादने व जोखमीच्या क्षेत्रातील त्यांची अनुभवकुशलता यांना एकत्र आणत भारतीय कुटुंबांना अर्थपूर्ण संरक्षण पुरविणारी आहे.”

मुथूट फिनकॉर्प लिमिटेड (एमएफएल) विषयी

मुथूट पप्पाचान समूह या १३८ वर्षे जुन्या उद्योगसमूहाची प्रमुख कंपनी मुथूट फिनकॉर्प लिमिटेड ही वैविध्यपूर्ण वित्तीय उत्पादने आणि सेवा यांच्या विस्तृत संग्रहाच्या माध्यमातून वित्तीय स्वास्थ्याची हमी देत सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्याचे लक्ष्य बाळगणारी भारतातील अग्रगण्य नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) आहे. आज ही कंपनी भारतभरात कार्यरत असलेल्या आपल्या ३,७५० हून अधिक शाखांच्या माध्यमातून तीन डझनांहून अधिक उत्पादने व सेवा देऊ करते आणि ज्यांच्यापर्यंत बँकिंग सेवा पोहोचलेली नाही अशांना सेवा पुरविण्याचे, त्यांचा सर्वात विश्वासू वित्तीय साथीदार बनण्याचे आणि भारतातील प्रत्येक घराचे आर्थिक समावेशन होईल याची खातरजमा करण्याचे लक्ष्या बाळगते. मुथूट फिनकॉर्पचा प्रदीर्घ अनुभव, तज्ज्ञत्व आणि निमशहरी व ग्रामीण भागांत असलेले भक्कम स्थान यांच्यामुळे कंपनी जनसामान्यांना झटपट आणि गरजेनुसार वित्तीय पर्याय देण्यास सक्षम बनली आहे.

एचडीएफसी लाइफ विषयी

२००० साली स्थापन झालेली एचडीएफसी लाइफ ही भारतातील एक लिस्टेड, दीर्घकालीन जीवनविमा उपाययोजना पुरविणारी कंपनी आहे, जी ग्राहकांच्या सुरक्षा, पेन्शन, बचत, गुंतवणूक, अॅन्युइटी व आरोग्य यांसारख्या विविध गरजा पूर्ण करणाऱ्या वैयक्तिक आणि सामुहिक विमा योजनांची विस्तृत श्रेणी पुरविते. कंपनीकडे ७० हून अधिक उत्पादने (वैयक्तिक आणि सामुहिक उत्पादने) आहेत, जिच्या पोर्टफोलिओमध्ये पर्यायी पूरक उत्पादनांचाही समावेश आहे, जी ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करतात. एचडीएफसी लाइफला आपल्या शाखा आणि अनेक नव्या टाय-अप्स व भागीदारींच्या माध्यमातून वाढलेले वितरणासाठीचे अतिरिक्त टच-पॉइंट्स यांच्यामुळे देशभरात विस्तारलेल्या कार्यकक्षेचा लाभ मिळत राहतो. कंपनीच्या सेवा वितरणासाठीच्या पार्टनरशिप्सची संख्या ५०० हून अधिक आहे, ज्यात एनबीएफसी, एमएपआय, एसएफबी, ब्रोकर्स, नवीन इकोसिस्टीम, भागीदार आदींचा समावेश आहे. कंपनीकडे वित्तीय सल्लागारांचा भक्कम आधार आहे. अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या. याखेरीज तुम्ही फेसबुक, ट्विटर, यूट्यूब आणि लिंक्‍डइनच्या माध्यमातूनही आमच्याशी संपर्क साधू शकता.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande